vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

महाराष्ट्र राज्य कर विभागामार्फत बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणी २०.२० कोटी रुपयांची करचोरी उघड..

महाराष्ट्र राज्य कर विभागामार्फत बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणी २०.२० कोटी रुपयांची करचोरी उघड..

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत मेसर्स सूर्या एंटरप्रायजेस या व्यापार संस्थेविरोधात सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने एकूण २०.२० कोटी रुपयांच्या बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) प्रकरणात संस्थेचे मालक निखिल नरेश वालेचा (वय २८ वर्षे) यास अटक करण्यात आली आहे.

ही व्यापार संस्था दि. ८ सप्टेंबर, २०२१ रोजी वस्तू व सेवा कर कायद्यान्वये नोंदणीकृत झाली असून, संबंधित व्यक्तीने कोणतीही वस्तू अथवा सेवा प्रत्यक्षात न प्राप्त करता, तसेच कोणत्याही वस्तूंची देवाण-घेवाण न करता, फसवणूक करणाऱ्या पद्धतीने बनावट बीजकांच्या आधारे ITC प्राप्त केल्याचे निदर्शनास आले आहे.

तपासादरम्यान व्यापाराच्या नोंदणीकृत पत्त्यावर भेट दिल्यानंतर असे आढळून आले की, आरोपीने १७.०३ कोटी रुपयांचे बनावट ITC अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या माध्यमातून प्राप्त केले असून, ३.०३ कोटी रुपयांचे अतिरिक्त ITC चुकीच्या पद्धतीने GST विवरणपत्रांमध्ये दाखविण्यात आले होते. या व्यवहारांसाठी कोणतीही वस्तू अथवा सेवा प्रत्यक्षात प्राप्त झालेली नव्हती.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, उल्हासनगर यांनी निखिल वालेचा यादि. ३० जुलै २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत बनावट बीजक व खोट्या व्यवहारांद्वारे केली जाणारी करचोरी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या विशेष तपास मोहिमेअंतर्गत करण्यात आली. कारवाई राज्यकर सहायक आयुक्त संतोष लोंढे, कर अधिकारी दीप्ती पिलारे, सुजीत कक्कड, संतोष खेडकर तसेच निरीक्षक व कर सहाय्यक यांच्या विशेष पथकाच्या मदतीने करण्यात आली.

संपूर्ण तपास राज्यकर सह आयुक्त (अन्वेषण-क), मुंबई यांच्या आदेशानुसार व राज्यकर उपआयुक्त यास्मीन अजीम मोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला.ही कारवाई चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील राज्य जीएसटी विभागाची पाचवी अटक असून, करचोरी, बनावट बीजक निर्मिती, खोट्या उलाढाली दाखविणे व बेकायदेशीरपणे ITC मिळविणे अथवा हस्तांतरित करणे यांच्याविरोधात विभागाने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.

संबंधित पोस्ट

शरद पवार असो वा फडणवीस, कोणीही ओबीसीमध्ये नवीन जात टाकू शकत नाहीत, अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार; छगन भुजबळांचा इशारा

vishwatmaklokswamivarta

श्री क्षेत्र धामणगाव देव येथील यात्रा महोत्सवात भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त दोन दिवसीय यात्रा महोत्सवाचे आयोजन; सुमारे ५० हजार भाविक येण्याचा अंदाज

vishwatmaklokswamivarta

एमएसआरडीसी’चे रस्ते प्रकल्प गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावेत- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

सिनेअभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये रंगणार हुरडा पार्टी व संक्रांत महोत्सव

पर्यटन क्षेत्रातील उद्यमीला मुकलो केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांनावीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार  – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे