vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान‘मिशन महाग्राम’राबवून गावे समृद्ध करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान‘मिशन महाग्राम’राबवून गावे समृद्ध करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत सर्व शासकीय विभागाच्या समन्वयातून कृषी जलसंधारण पर्यावरण शिक्षण आणि आरोग्य या विषयाचे योजनांचे अभिसरण करुन मिशन महाग्राम राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

  मौलाना आझाद संशोधन केंद्र सभागृहामध्ये ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत मिशन महाग्राम प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख, ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सिंग बयास, जिल्हा कार्यक्रम समन्वयक किरण बिलोरे, आयडीबीआय बँकेचे प्रादेशिक मुख्य व्यवस्थापक व्यंकट रमणा वेंकटा, रवी अश्वाणी यांच्यासह कन्नड खुलताबाद आणि गंगापूर तालुक्यातील ग्राम समन्वयक उपस्थित होते.

जिल्ह्यात एकूण ३३ गावांमध्ये ‘मिशन महाग्राम’ राबविण्यात येत आहे. त्यात जलसंधारण, कृषी, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, रोजगार निर्मिती यासाठी शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण करण्यात येत आहे.   गावाचा विकास केंद्रस्थानी ठेवून काम करावे. त्या करीता ग्राम समन्वयकांसाठी प्रशिक्षण, संवाद व समन्वय राखून गावातील विकास आराखडा तयार करावा. आवश्यक योजनांची अंमलबजावणी करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.     जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अंकित म्हणाले की, ग्राम विकास आराखड्यात ज्या गोष्टीचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी सामाजिक दायित्व निधीची उपलब्धता करुन आरोग्य, शिक्षण, रोजगार, कुपोषण निर्मूलन व गुणवत्ता आधारित विकास यासारख्या गोष्टीवर खर्च करण्यात यावा. गावामध्ये रोजगार उपलब्ध करून ‘एक गाव एक उत्पादन’ या अंतर्गत विविध गावातील उत्पादने हे बाजारपेठेत उपलब्ध करावे. गाव विकास आराखडा तयार करत असताना पाणीपुरवठा, रस्ते, सांडपाण्यांचे नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले.

आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, आत्मा प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक धनश्री जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक अशोक शिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत श्री राजेंद्र देसले, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, विभागीय वन अधिकारी श्रीमती कीर्ती जमदाडे कोकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर आदी प्रमुख अधिकाऱ्यांनी दिवसभर ग्राम समन्वयकांना मार्गदर्शन करणार आहेत.

संबंधित पोस्ट

गुजरात मधील बनासकाठा येथे एका फटाके कारखान्यात भीषण आग लागली, ज्यात बॉईलर फुटल्याने मोठा स्फोट झाला आणि 17 जणांचा बळी गेला, तर 3 जण बेपत्ता आहेत.

गुणवंत खेळाडु विद्यार्थ्यी यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

आझाद मैदान दंगल : १३ वर्षे झाली, तरी वसुली नाही व कारवाई शून्य !हानीभरपाईची कारवाई थांबवणे धक्कादायक; दोषींवर दिवाणी दावे दाखल करून रझा अकादमीकडून वसुली करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करा**कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल**विविध यंत्रणांकडून तयारीचा आढावा*

विधान परिषद लक्षवेधी-सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत अंतिम अहवालानंतर दोषींवर कारवाई- गृह राज्यमंत्री पंकज भोयर

महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समाज समिती चा महामोर्चा…

vishwatmaklokswamivarta