vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नसरापुरच्या त्या नराधमाला भरचौकात फाशी द्या – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

नसरापुरच्या त्या नराधमाला भरचौकात फाशी द्या – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

मुंबई प्रतिनिधी – पुणे जिल्हयातील भोर तालुक्यातील नसरापुर गावात अवघ्या चार वर्षाच्या कोवळया मुलीवर अत्याचार करुन तिची दगडाने ठेचुन निर्घुण हत्या

करणा-या नसरापुरच्या नराधमाला भरचौकात लोकांसमोर फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

 नसरापुरमधील हे बालिका अत्याचार आणि खुन प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे आहे. या प्रकरणाची माहिती कळताच ना. रामदास आठवले यांनी आपला तिव्र संताप व्यक्त केला आहे. नसरापुरमधील गावक-यांनी नराधम आरोपीविरुध्द केलेल्या निषेध आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.

 पोलिसांनी त्या नराधम आरोपीला अटक केलेली आहे. त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे अशा तिव्र संतापाची भावना ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली. आपला महाराष्ट्र, आपला भारत देश हा नितीमत्तेवर आधारलेला आहे. नीतिमत्तेवर आधारलेला समाज घडवायचा आहे. मात्र वारंवार अशा माणुसकीला काळिमा फासणा-या घटना घडत आहेत. हे अत्यंत चिंतेच आहे. समाजात माणुसकी शिल्लक राहिलीच नाही असा प्रश्न उपस्थित होतो. माणुसकीला काळिमा फासणारे प्रकरण रोखले पाहिजे. त्यासाठी नितीमत्तेवर आधारलेला समाज या देशात निर्माण झाला पाहिजे. नितीमत्तेला, माणुसकीला आग लावणा-या अशा प्रकरणातील नराधम आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी संसदेने कायदा केलेला आहे. नसरापुरमधील त्या नराधमाने केलेले दुष्कृत्य निंदनीय आहे.त्यास भरचौकात लोकांसमोरच फाशी दिली पाहिजे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे. या प्रकरणाचा ना. रामदास आठवले यांनी तिव्र शब्दांत निषेध केला आहे.

00000

संबंधित पोस्ट

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज“शून्य अपघात हे आपले ध्येय”आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी

महाराष्ट्र भूषण राम सुतार श्रद्धांजली सभेचे उद्या दिल्लीत आयोजन

vishwatmaklokswamivarta

शाळा म्हणजे जीवन शिक्षणाचे मंदिर शाळेमध्ये भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे – जिल्हाधिकारी संतोष पाटील

मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दिंडोरीच्या घटनास्थळाची पाहणी

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान

स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा