vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

उमाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

उमाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

बुलढाणा, (प्रतिनिधी)

तालुक्यातील उमाळा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील १६ ते २३ जानेवारी कालावधीमध्ये श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या‌ यामध्ये दररोज पहाटे ४ ते ६ काकडा, ७ ते ८ विष्णू सहस्त्र नाम, ८ ते ९ गीता पारायन, १० ते ११ गाथा भजन, दुपारी १ ते ४ भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० हरीकीर्तन, असे दैनंदिन कार्यक्रम असणार आहे. विठ्ठल रूखमिणी मंदिर उमाळा येथे कथाकार भागवताचार्य ह.भ.प. दिनेश महाराज बोडखे, वैजापूर यांच्या रसाळ वाणीतून भाविकांना श्री शिव महापुराण कथेचे श्रवण करता येणार आहे. यादरम्यान १६ जानेवारी रोजी हभप गोपाल महाराज भुसारी, १७ जानेवारी हभप रेणुकाताई महाराज जाधव, १८ जानेवारी हभप क्रांतीताई महाराज, १९ जानेवारी हभप शुभम महाराज गोरे, २० जानेवारी हभप विकास महाराज जाधव, २१ जानेवारी हभप ज्ञानेश्वर माऊली भवर, २२ जानेवारी हभप गणेश महाराज मगर, वेदशास्त्र संपन्न बाजीराव स्वामी वारकरी शिक्षण संस्था, गारज यांच्या हरीकीर्तनांचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. गायनाचार्य हभप रिंकेश महाराज, हभप वाल्मिक महाराज, हभप अरुण महाराज, हभप सागर महाराज, हभप प्रशांत महाराज, मृदुंगाचार्य योगेश महाराज यांचा समावेश असणार आहे. तर हभप संदिप महाराज सांगळे यांचे २३ जानेवारीला काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे वाटप होईल. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उमाळा वासियांच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांनाभारतरत्न मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार   – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील भरती प्रक्रिया पारदर्शक व ऑनलाईन होणार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

जालन्यात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आमदार निधी देणार- आ. अर्जुनराव खोतकर महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यातही गरजेचे-संतोष खांडेकर

अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला तातडीने द्या ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते जवळगा (सेलू) येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यकØ राज्य निवडणूक आयोगाचे आदेश जारीØ जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठीत…

vishwatmaklokswamivarta