vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अपघातात निधन झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबियांना बँक ऑफ इंडियाच्या वतीने 60 लाखाचा विमा धनादेश सुपूर्द

अपघातात निधन झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबियांना बँक ऑफ इंडियाच्या वतीने 60 लाखाचा विमा धनादेश सुपूर्द

        सांगली, प्रतिनिधी : करंजवडे- येतवडे मार्गावर झालेल्या भीषण अपघातात चिकुर्डे येथील प्राथमिक शिक्षक चंद्रशेखर बबन पाटील यांचे दुर्दैवी निधन झाले होते. चंद्रशेखर पाटील यांच्या अपघाती निधनामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. चंद्रशेखर यांचे बँक ऑफ इंडिया चिकुर्डे शाखेमध्ये पगार खाते होते. बँक ऑफ इंडियामध्ये पगार खाते असल्यास मोफत 60 लाख अपघाती मोफत विमा संरक्षण उपलब्ध आहे. अगदी कमी दिवसामध्ये बँक ऑफ इंडियाने 60 लाखाचा विमा मंजूर करून दिला. या विम्याचा 60 लाखांचा धनादेश आज चंद्रशेखर पाटील यांच्या वारसांना बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक पुनीत द्विवेदी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

   बँक ऑफ इंडियाच्या या पगार खात्याच्या अपघाती विमा सुविधेमुळे कुटुंबियांना आर्थिक आधार मिळाला आहे. या सहकार्यामुळे पाटील कुटूंबियांनी बँकेचे आभार मानले आहेत. बँक ऑफ इंडियाच्या वतीने चंद्रशेखर पाटील यांच्या कुटुंबीयांना मदत करताना अत्यंत संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

     सर्व ग्राहकांना बँक ऑफ इंडिया पगार खाते योजनेबरोबरच बँकेच्या इतर योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन श्री. द्विवेदी यांनी यावेळी केले.      यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू दाभाडे, सचिन इंगवले, लखन मकानदार, विपणन विभाग प्रमुख रंगनाथ कचरे, बँक ऑफ इंडिया चिकुर्डे शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

अ.भा. लोकहित महासंघाची स्थापना

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामतालिकेसाठीपात्र व्यक्तींनी ३१ मेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

डीपी बोले तो.. डेमोक्रसी पार्टिसिपेशन” उपक्रम प्रशंसनीय – निवडणूक निरीक्षक जीवनेस्वीप समितीच्या ‘डीपी, स्टेटस व रिंगटोन’ उपक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

vishwatmaklokswamivarta

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव या अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत राहून आरोग्यसेवेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या सात आरोग्य योद्ध्यांचा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार

मिरा भाईंदर अपर तहसिलदार कार्यालयांतर्गत“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” संपन्न

कोकणातील हृदय पिळवटून टाकणारी घटना: कुमारी आर्या चव्हाण हिच्या क्रूर हत्येचा तारळेत तीव्र निषेध मोर्चा..

vishwatmaklokswamivarta