vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

 

मुंबई सांस्कृतिक प्रतिनिधी

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. येत्या २५ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांची असून, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात शुक्रवार दिनांक २५ एप्रिल, २०२५ रोजी पहिल्या पुष्पात सायंकाळी ६.०० वाजता विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर आहे. तर याच दिवशी उस्ताद शाहिद परवेझ यांचाही शास्त्रीय गायनाचा कार्यकम होणार आहे. शनिवार दिनांक २६ एप्रिल, २०२५ रोजी दुसऱ्या पुष्पात सायंकाळी ६.०० वाजता डॉ. भरत बलवल्ली तसेच विदुषी मंजुषा पाटील यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यकम होईल. रविवार दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ज्येष्ठ गायक पं. आनंद भाटे आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

 उपरोक्त शास्त्रीय संगीत महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामुल्य ठेवण्यात आलेला आहे. विनामुल्य प्रवेशिका रवींद्र नाट्य मंदिर-प्रभादेवी, छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर आणि यशवंत नाट्य मंदिर-माटुंगा येथे उपलब्ध आहेत.    भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

बॉलीवूड अभिनेत्री शेफाली  जरीवाला वयाच्या ४२ व्या तिने अखेरचा श्वास घेतला. निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा…

कोल्हापुरात रंगणार संत ज्ञानेश्वरांच्या जीवनप्रवासाचा सोहळा; ‘मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे आयोजन

उदयपूर फाइल्स- सत्य घटनेवर  कन्हैयालाल दर्जी हत्याकांडावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, ११ जुलै रोजी जगभरात प्रदर्शित होणार

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी साई दरबारी झाली नतमस्तक…

विनविन मार्क्वेझने मिस युनिव्हर्स फिलीपिन्स मुनटिनलुपा 2025 चा ताज जिंकला..

vishwatmaklokswamivarta

महाभारत या लोकप्रिय मालिकेत कर्ण ही भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगाने निधन…

vishwatmaklokswamivarta