vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खिल्लारे परिवाराची वृद्धाश्रमाला भरीव मदत-फ्रिज, कुलर, कपाट, खुर्ची सह दिले भोजनदान…

खिल्लारे परिवाराची वृद्धाश्रमाला भरीव मदत-फ्रिज, कुलर, कपाट, खुर्ची सह दिले भोजनदान…

 

चिखली :- प्रतिनिधी-

गेल्या पंचवीस वर्षांपासून पतीचे छत्र डोक्यावरून हरवल्याने निराश न होता हिम्मत न हारता चार मुलीचे शिक्षण करून चांगल्या घरी लग्न लावून दिले. आज चारहि जवाई हे सासूला सासू न समजता आई प्रमाणे जीव लावतात. या आईने आपले पती कालकथित अशोक खिल्लारे (वायरमन) यांच्या 25 व्या पुण्यतिथी निमित्त निराधार बेघर वयोवृद्धांची सेवा करीत असलेल्या मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धाच्या सेवेकरीता फ्रिज, कुलर,कपाट, खुर्ची व भोजनदान देऊन समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.

कालकथित अशोक खिल्लारे हे विदयुत महामंडळ मध्ये कर्तव्यात असतांना दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली असा आप्त परिवार असतांना त्यांच्या पत्नी लताबाई अशोक खिल्लारे यांनी चारहि मुलींना उच्च शिक्षण देऊन चांगल्या मोठया परिवारात विवाह करून दिले. पतीच्या आशिर्वादामुळे आजपर्यँत मी जीवन संघर्ष करून सुखी समाधानी आहे म्हणून निराधार बेघर लोकांना मदत व्हावी या हेतूने ही मदत केली आहे. वृद्धाच्या उर्वरित जीवनात काहीसा क्षण आनंद दयावा या हेतूने ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,भोकर येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेले ज्यांना मुल मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांना सांभाळू शकत नाही असे आजी आजोबा,यांना सर्व सुविधा देऊन मोफत संगोपन होत आहे. मानवाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणजे वृद्धपकाळ हा सुखद व आनंदमई जावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर च्या वृद्धाश्रमातील वृद्धाच्या सेवेकरिता थंड पाणी, पालेभाजी टवटवीत राहण्यासाठी फ्रिज, तर उन्हाळ्यात थंड हवेचा आस्वाद मिळण्यासाठी कुलर, तसेच कपडे नीटनिटके राहण्यासाठी कपाट व सर्वाना एक दिवसाचे भोजन अशी भरीव मदत प्रा. डॉ. सुभाष राऊत यांच्या माध्यमातून खिल्लारे परिवाराच्या वतीने देण्यात आली.

यावेळी प्रा.डॉ. सुभाष राऊत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये लता अशोक खिल्लारे, कुसुमबाई खंदारे, ज्ञानेश्वर हिवाळे, कविता हिवाळे, शिवनारायण गवई, वनिता गवई, निलेश हिवाळे, ललिता हिवाळे, आकाश गवई, सुजाता गवई हे उपस्थित होते. खिल्लारे परिवाराने केलेल्या भरीव मदती बद्दल संचालक प्रशांत डोंगरदिवे व रुपाली डोंगरदिवे यांनी आभार व्यक्त करीत कुठेही निराधार बेघर वयोवृद्ध आढळून आल्यास तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात दाखल करावे असे आवाहन केले आहे.

संबंधित पोस्ट

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठी गती…

vishwatmaklokswamivarta

वारकऱ्यांच्या सेवेसाठी साताऱ्यात चरणसेवा पथके सज्ज; एक हजाराहून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

जालना जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न ऑलिम्पिक स्पर्धेतील दर्जाचा स्विमींग पुल तयार करण्यात यावा  – पालकमंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

माजलगाव वाळू तस्करी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रमउत्कृष्ट अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा प्रथमच गौरव

डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिक नोंदणी करण्याचे आवाहन