vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती-29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार- राज्य लोकसेवा आयोगाची माहिती

पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती-29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार- राज्य लोकसेवा आयोगाची माहिती

मुंबई, प्रतिनिधी: राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात ‘पशुधन विकास अधिकारी’ या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना 29 एप्रिल 2025 पासून 19 मे 2025 पर्यंत आपला अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या मागणीवरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पशुसंवर्धन विभागात ‘पशुधन विकास अधिकारी’ या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पदांचा तपशील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करताना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

000000

संबंधित पोस्ट

ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय टायगर दिन निमित्त पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं काही दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांची घोषणा केली.वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे; त्याच्या ताकदीच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

vishwatmaklokswamivarta

शिक्षणमत्री धर्मेद्र प्रधान याच्या राजिनाम्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुग याच्या उपोषणाला खोरिपाचा पाठिंबा-

लोक संस्कृतीच्या जतनासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करा- राज्यपाल हरिभाऊ बागडे

जिल्ह्याची ओळख निर्माण करणारे ब्रँड उत्पादन उमेदअंतर्गत तयार करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी जिल्हा परिषद यंत्रणेचे भरभरून कौतुक…