vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आरोग्य यंत्रणांचा आढावा दिवाळी आरोग्यदायी व्हावी यासाठी खबरदारी घ्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आरोग्य यंत्रणांचा आढावा दिवाळी आरोग्यदायी व्हावी यासाठी खबरदारी घ्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी नुकतीच झालेली अतिवृष्टी, त्यामुळे दूषित झालेले जलसाठे, दिवाळी सारख्या सणामुळे खाद्यपदार्थांतून होणाऱ्या भेसळीचा वाढता धोका या पार्श्वभुमिवर आरोग्य यंत्रणांनी अधिक सतर्क राहून दिवाळी आरोग्यदायी व्हावी यासाठी खबरदारी घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आरोग्य यंत्रणांना दिले.

 जिल्हा आरोग्य यंत्रणांचा आज आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, महिला व बालविकास अधिकारी मंगला पांचाळ तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत वातावरणीय बदल व आरोग्य, नियमित लसीकरण, गोवर रुबेला लसीकरण, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अभियान, एचआयव्ही एड्स नियंत्रण अभियान, गर्भलिंग निदान विरोधी अभियान , आपात्कालिन वैद्यकीय सेवा याबाबत आढावा घेण्यात आला.

 जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या गेल्या वर्षा इतकीच असली तरी अपघातानंतर मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याबाबत आरोग्य सेवांची समिक्षा करण्यात यावी. जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन आरोग्य विषयक मार्गदर्शन करावे,असे निर्देश त्यांनी दिले.

 अतिवृष्टिमुळे ग्रामिण भागात पाणीसाठे व स्रोत दूषित झाले आहेत. तसेच शहरी भागात सणाच्या पार्श्वभुमिवर अन्नपदार्थात भेसळ होण्याची शक्यता आहे. त्याविरुद्ध संबंधित विभागांनी बाजारात मिळणारे अन्न पदार्थ नमुने चाचणी करावी. ऐन सणासुदीत नागरिकांचे आरोग्य उत्तम राहिल यासाठी अरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी. खेडोपाडी पाण्याचे नमुने तपासावे. नैमित्तिक संसर्ग उद्रेकांबाबत खबरदारी घ्यावी व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

०००००

संबंधित पोस्ट

जैन संत व स्वातंत्र्य सेनानी आचार्य जवाहर लाल महाराज . त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुद्रा तसेच टपाल तिकीट काढून त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढ्यांना देण्याचे कार्य स्तुत्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी..

vishwatmaklokswamivarta

एकल महिला धोरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय – सचिव तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचा ‘एआय आधारित’ व्हाट्सॲप चॅटबॉट

vishwatmaklokswamivarta

महिला बचतगटांचा दिवाळी फराळ, खाद्यान्ने खरेदी करुन प्रोत्साहन द्यावे- मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महोपात्र,मेळघाट हाट येथे भव्य विक्री व प्रदर्शन मेळावा 19 ऑक्टोबरपर्यंत..

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गणेश चतुर्थी तसेच गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

vishwatmaklokswamivarta