vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

मुंबई, प्रतिनिधी

ऊर्जा विभागाने सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करावा, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केले.

निर्मल भवन येथे ऊर्जा विभागातर्फे २८ एप्रिल ते १२ मे, २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाड्याच्या तयारीचा आढावा घेताना राज्यमंत्री श्रीमती साकोरे – बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी महावितरणचे उपसचिव नारायण कराड, सह सचिव उद्धव डोईफोडे, मुख्य विद्युत निरीक्षक संदीप पाटील, महावितरणचे संचालक अरविंद बाधिकर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता आणि विद्युत निरीक्षक दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

सेवा पंधरवड्याची शपथ विभागाच्या प्रत्येक कार्यालयात घेण्यात यावी. पंधरवड्याच्या निमित्ताने ऊर्जा विभागाच्या सर्व कार्यालयांना आवश्यक त्या सोयीसुविधांनी सुसज्ज करावे, जेणेकरून कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल. तसेच नागरिकांच्या तक्रारी वेळेत सोडवण्याची कार्यपद्धती अधिक प्रभावी करावी, असे राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

महावितरणने प्रत्येक नागरिकाच्या अडचणी तात्काळ सोडवण्यावर भर द्यावा. तसेच मान्सूनपूर्व सर्व विद्युत कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने पोर्टल अद्ययावत करण्याच्या सूचनाही,

संबंधित पोस्ट

नगरविकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा-छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, लातूर विजेते…

vishwatmaklokswamivarta

बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत

vishwatmaklokswamivarta

जलसंपदा विभागाचे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पारितोषिक वितरण,महाराष्ट्र जलसमृद्ध करायचाय-डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रमउत्कृष्ट अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा प्रथमच गौरव

जालन्यात ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा’ आयोजन

गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मत्स्य व्यवसाय विभागाच्या १०० दिवसाच्या नियोजनाचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta