vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

राष्ट्रीय पशुधन योजना अंतर्गत पशुपालकांना लाभ देण्यासाठी सक्रिय पावले

राष्ट्रीय पशुधन योजना अंतर्गत पशुपालकांना लाभ देण्यासाठी सक्रिय पावले

 

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे) – जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत भारत सरकारच्या राष्ट्रीय पशुधन योजनेचा (National Livestock Mission) प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्रिय प्रयत्न सुरू आहेत. ही योजना पशुपालकांना व्यवसायिक दृष्टिकोनातून सक्षम बनविण्याचा उद्देश समोर ठेवून राबविण्यात येत आहे.

योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे उपयोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे:

1. पशुधन विकासासाठी वित्तीय सहाय्य– कुक्कुटपालन, शेळीपालन, डुक्करपालन, दुभती जनावरे अशा विविध घटकांसाठी आर्थिक अनुदान व सवलती उपलब्ध.– लाभार्थ्यांनी स्वत:च्या मालकीची जमीन अथवा इतर आवश्यक सुविधा दाखवणे बंधनकारक.

2. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया– अर्ज ah.mahabms.com या पोर्टलवरून सादर करता येतील.– अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे (आधारकार्ड, बँक पासबुक, उत्पन्न दाखला, प्रकल्प अहवाल इ.) अपलोड करणे आवश्यक आहे.– अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धतीने पार पडणार आहे

3. योजनेच्या प्रचारासाठी विशेष प्रयत्न– गावपातळीवर जनजागृती मोहीम, पोस्टर व बॅनर्सद्वारे माहिती प्रसार.– कृषी मेळावे, पशुपालक मेळावे आयोजित करून थेट संवाद.– ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन.

4. लाभार्थ्यांची निवड व प्राधान्य– अल्पभूधारक, महिला, अनुसूचित जाती-जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य.– निवड प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक मार्गाने होणार आहे.

      ठाणे जिल्ह्यात 2024-25 या आर्थिक वर्षात पशुधन व्यवसायासाठी अनेक लाभार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले असून, अधिकाधिक पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समिर तोडणकर यांनी केले आहे.अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ: https://ah.mahabms.comमोबाईल अ‍ॅप: AH-MAHABMS (Google Play Store वर उपलब्ध)

000

संबंधित पोस्ट

अमरावतीत होणार आंतरराष्ट्रीय ‘एआय’ परिषद

vishwatmaklokswamivarta

दिल्लीत गणरायाचे भक्तिमय स्वागत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा; महाराष्ट्र सदनासह मंडळांमध्ये उत्साहाचा जयघोष

एसटी महामंडळ आणि एसटी कामगारांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले पाहिजेत अशी राज्य शासनाची भूमिका असून राज्य शासन एसटी कामगारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीचा घेतला आढावा,योग हा केवळ एक व्यायाम नाही तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील एकतानता साधण्याचा मार्ग: केंद्रीय मंत्री जुआल ओराम.

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी रोजगार मेळावा

जिंतूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक नागरिकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पाहोचविण्यास शासन कटीबध्द – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर