vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह कर्मचारी भरती…

ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह कर्मचारी भरती…

 ठाणे, प्रतिनिधी:- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे यांच्या आधिपत्याखालील धर्मवीरनगर, नौपाडा, ठाणे (पश्चिम) येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह, ठाणे आणि माजी सैनिक विश्रामगृह, ठाणे या दोन आस्थापनांवर शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी माजी सैनिक आणि नागरी प्रवर्गातून कर्मचारी भरती करण्यात येणार आहे

वसतिगृहासाठी भरण्यात येणारी पदे :- A) सहाय्यक वसतिगृह अधीक्षक – 01(फक्त माजी सैनिक प्रवर्गातून), B) पहारेकरी (निवासी) – 01, C) स्वयंपाकी – 03, D) सफाई कर्मचारी – 01.विश्रामगृहासाठी भरण्यात येणारी पदे :- A) स्वागत कक्ष सहायक – 01 (फक्त माजी सैनिक प्रवर्गातून), B) पहारेकरी (निवासी) – 01, C) सफाई कर्मचारी – 01, D) माळी – 01.

ह्या नियुक्ती कंत्राटी पद्धतीने अशासकीय संवर्गातून महाराष्ट्र शासन यांचे सैनिक कल्याण विभाग, पुणे द्वारे वेळोवेळी निर्धारीत एकत्रीत मानधनावर असतील. नागरी उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड असल्यास अनुभवाचा दाखला तसेच रहिवाशी पुरावा जोडणे बंधनकारक राहील. माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना उल्लेखीत कागदपत्रांसह त्यांचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाद्वारे देण्यात आलेले ओळखपत्र, डिस्चार्ज बुक/सर्व्हिस पर्टीक्युलेर यांची प्रत जोडणे अनिवार्य आहे.

अर्ज मिळणे आणि जमा करण्याचा पत्ता – 1) सैनिकी मुलांचे वसतिगृह ठाणे, धर्मवीरनगर, नौपाडा, ठाणे (प) – 400604 तसेच 2) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे, रु.नं. ४०२, कलेक्टर ऑफिस, कोर्ट नाका, ठाणे (प)-४००६०१ (सोमवार ते शुक्रवार फक्त). सेवा नियम, मानधन इत्यादी अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक मो. ९७६९६६४८३० (वसतिगृह), 9246624105(अधीक्षक). अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 08 जून 2025 असून निवड प्रक्रिया मुलाखती दि. 10 आणि 11 जून 2025 (मंगळवार आणि बुधवार) रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे येथे घेण्यात येतील. उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीचा दिवस भ्रमणध्वनी द्वारे कळविण्यात येईल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर मे. प्रांजळ जाधव (नि.) यांनी कळविले आहे.

000000000

संबंधित पोस्ट

राज्यातील उद्योजकता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित ‘महा निर्यात-इग्नाइट महाराष्ट्र कन्व्हेन्शन २०२६’ चा ठाणे जिल्हास्तरीय मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta

ग्रामपंचायतीतील आपले सरकार सेवा केंद्रांमधून आता ५०० हून अधिक शासकीय सेवा उपलब्ध-सर्व केंद्रे अद्ययावत करण्याचे सीईओ मेघना कावली यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

आषाढी एकादशी यात्रा: पूर्वतयारी आढावा बैठक भाविकांना सुरक्षा, स्वच्छता आणि सेवा द्या – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नव्या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ५१९ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता-पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक* जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण ४००.७८ कोटी* अनुसूचित जाती उपयोजना १०० कोटी* आदिवासी घटक कार्यक्रम १८.६५ कोटी

vishwatmaklokswamivarta

आपत्ती निवारणासाठी प्रशासन अलर्ट; पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश दारव्ह्यातील दहेली येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक, आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांचा घेतला आढावा

विशेष लेख -: इतिहास, भूगोल आणि प्रेरणादायी वारसा : किल्ले शिवनेरी

vishwatmaklokswamivarta