राज्यात बॉम्बस्फोट करण्याची धमकीचा संदेश; मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला धमकीचा ईमेल भारत-पाकिस्तान तणाव परिस्थीतीदरम्यान मुंबई हाय अलर्ट..
मुंबई प्रतिनिधी-
भारत-पाकिस्तान तणाव वातावरण- राज्यात बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा एक ई-मेल मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी दक्षता नागरिकांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे
मुंबई पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. या मेलमध्ये 2 दिवसात बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच राज्यातील कुठल्याही भागाला दुर्लक्ष करू नका, असंही या मेलमध्ये म्हंटलं आहे. हा मेल कोणी केला याचा तपास सध्या सुरू आहे. सोमवार ते बुधवारदरम्यान सर्वांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.