vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान लोक चळवळ व्हावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान लोक चळवळ व्हावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई प्रतिनिधी-राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांमध्ये राबविण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानामध्ये एसटी कर्मचाऱ्यांसोबतच लोकांनीही सहभागी व्हावे आणि ती एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कुर्ला बसस्थानक येथे या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केली.

यावेळी मंत्री श्री सरनाईक म्हणाले की आपण आपल्या घरात ज्या पद्धतीने स्वच्छता ठेवतो त्याप्रमाणे आपण जेथे काम करतो तेथे देखील आपले घर समजून त्या कार्यालयाची त्या बसस्थानकाची स्वच्छता ठेवणे हे आपले कर्तव्य आहे भविष्यात स्वच्छ सुंदर सुशोभित बस स्थानके नक्कीच प्रवाशांना आकर्षित करतील अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये बस प्रवास करण्याचा आनंद त्यांना घेता येईल अर्थात स्वच्छता हा एक संस्कार आहेत तो जसा एसटी कर्मचाऱ्यांनी अंगिकाराने महत्त्वाचे आहे तसेच प्रवाशांनी आपल्या आचरणात आणला पाहिजे बस स्थानक ही सार्वजनिक जागा आहे तेथे स्वच्छता ठेवणे ही एसटी कर्मचारी आणि प्रवासी या दोघांची संयुक्त जबाबदारी आहे स्वच्छतेबाबत परदेशात जेवढी सजता आणि जागरूकता आहे

तेवढी आपल्या देशात नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु आपण स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जनजागृती करून आपली बस स्थानके स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे या स्पर्धात्मक अभी यानातून एसटीच्या अधिकारी कर्मचारी आपले बस स्थानक स्वच्छ सुंदर तापीत ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेत या माध्यमातून भविष्यात चांगली सुंदर बस स्थानके प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील अशी अशा यावेळी सरनाईक यांनी व्यक्त केली

एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांनी प्रास्ताविक केले उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी अभियानाची रूपरेषा मांडली तर उपमहाव्यवस्थापक जयेश बामणे यांनी आभार मानले या कार्यक्रमाला एसटीचे अधिकारी कर्मचारी तसेच प्रवासी मोठे संख्येने उपस्थित होते

संबंधित पोस्ट

विदर्भातील पूरस्थितीचा आढावा-मदत आणि पुनर्वसन कार्य तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश- मंत्री गिरीश महाजन

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ…

सिडको वाळूज ग्रोथ सेंटर जमीन संपादनासाठी टीडीआर व सर्वसमावेशक आरक्षणाचा पर्याय – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

यात्रा ठिकाणी अन्न व्यावसायिकांनी नोंदणी प्रमाणपत्राशिवाय व्यवयाय करु नये *-अन्न व औषध प्रशासन विभाग*

vishwatmaklokswamivarta

जगभरात सुरू असलेल्या विविध संघर्षांवर भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही नेहमीच शांतता आणि स्थैर्याचे आवाहन- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी