vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई धावत्या रेल्वेतून 8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले; 5 जणांचा मृत्यू, काही गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत

मुंबई धावत्या रेल्वेतून 8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले; 5 जणांचा मृत्यू, काही गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत

ठाणे प्रतिनिधी

मुंबई मध्ये लोकल ट्रेन मधून प्रवास करणारे 5 प्रवासी मुंब्रा स्थानकामध्ये ट्रॅक वरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विरूद्ध दिशेने जाणार्‍या दोन लोकल ट्रेन मधील प्रवासी एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. दरम्यान ट्रॅक वर पडलेल्या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेकडून जखमीने दिलेल्या माहितीच्या आधारे फूटबोर्ड वर असलेले प्रवासी खाली कोसळल्याचे सांगण्यात आले आहे. काही जखमींना नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याचेही सांगण्यात आले

ठाण्याजवळ असलेल्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना घडली. धावत्या लोकल ट्रेनमधून सुमारे आठ ते बारा प्रवासी खाली पडले. ही घटना सकाळी गर्दीच्या वेळेत घडली. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. बाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फास्ट लोकलमधून प्रवास करणारे 8 ते 12 प्रवाशांपैकी काही जण रेल्वे ट्रॅकवर आणि काही प्रवासी स्थानकावर पडले. सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे.

मध्य रेल्वेकडून जखमीने दिलेल्या माहितीच्या आधारे फूटबोर्ड वर असलेले प्रवासी खाली कोसळल्याचे सांगण्यात आले आहे. काही जखमींना नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. पाच प्रवाशांचा जीव घेणाऱ्या या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वे प्रशासनाकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान अंतर्गत ६ हजार ४६२ घरकुलांना मंजुरी जिल्ह्यात कातकरी कुटुंबांचे सर्व्हेक्षण युध्द पातळीवर सुरू१२ हजार २३७ घरकुलासाठी पात्र कातकरी कुटुंबियांना मिळेल पक्के घर…

आजपासून (दि.९) तीन दिवस दुर्मिळ वाद्यमहोत्सव

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांनी पाठयपुस्तकापुरते मर्यादित न राहता अवांतर वाचनाची सवय ठेवावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,शाळेच्या पहिल्याच दिवशी विदयार्थ्यांची बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक मरळक येथे उत्साहपूर्ण वातावरणात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न

शिराळा, चांदोलीसाठी सर्वसमावेशक पर्यटन आराखडा तयार करा  – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

लोकसेवा हक्क कायदा, आपली सेवा आमचे कर्तव्य*नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत वर्षभरात तब्बल ५० लाख ६८ हजार अर्ज वेळेत निकाली**आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची माहिती*

एन.डी.आर.एफ.ची पथक कराड येथे दाखल