vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजा रघुवंशी हत्या प्रकरण- हनिमूनदरम्यान मेघालयात बेपत्ता झालेली  सोनम रघुवंशी  सापडली! पोलिसांचा खळबळजनक दावा सी.एम चाही मोठा खुलासा…

 राजा रघुवंशी हत्या प्रकरण- हनिमूनदरम्यान मेघालयात बेपत्ता झालेली  सोनम रघुवंशी  सापडली! पोलिसांचा खळबळजनक दावा सीएम चाही मोठा खुलासा…

 

राज्य प्रतिनिधी-देशभरामध्ये चर्चेत असलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणानंतर बेपत्ता असलेली त्याची पत्नी सोनम रघुवंशी सापडली आहे. लग्नानंतर हनिमूनसाठी मेघालयाला गेलेल्या या जोडप्यापैकी नवऱ्याचा मृतदेह 2 जून रोजी एका धबधब्याजवळ सापडला होता. तेव्हापासून बेपत्ता असलेली सोनम सात दिवसांनंतर सापडली असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे. सोनमला उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथून अटक करण्यात आली आहे.सोनम गुन्ह्यात सहभागी; पोलिसांची माहिती दरम्यान, दुसरीकडे मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, मेघालय पोलिसांच्या डीजीपींनी राजाच्या हत्येमध्ये सोनमचा हात होता असं म्हटलं आहे. ‘झी न्यूज’ला दिलेल्या माहितीनुसार, सोनमनेच पतीच्या हत्येची सुपारी दिली होती अशी माहिती डिजीपींनी दिली आहे.

अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचं आव्हान

मागील सात दिवसांपासून सोनम नेमकी कुठे होती? ती काय करत होती? राजाची हत्या का करण्यात आली? यामध्ये सोनमला कोणीकोणी मदत केली? यासंदर्भातील तपास आता पोलीस करत आहेत. तर दुसरीकडे मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड कोंगकल संगमा यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच एका महिलेने समर्पण केलं असून एका आरोपीचा शोध सुरु असल्याचंही सांगितलं आहे. मध्य प्रदेशमधील तिघांना अटक करण्यात आली असून हे तिघेच हल्लेखोर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील बरीच रहस्य उलगडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ढाब्यावरुन करण्यात आली अटक मागील 7 दिवसांपासून सोनम बेपत्ता होती. सोनमला आज पहाटे गाजीपूरमधील एका ढाब्यावरुन अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आल्यानंतर सोनमने पोलिसांसमोरच तिच्या कुटुंबियांशी संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस सोनमला रुग्णालयात घेऊन गेले आहेत. वैद्यकीय चाचणीनंतर तिला कोर्टासमोर हजर केलं जाईल असं सांगितलं जात आहे. या प्रकरणात सोनमसहीत एकूण चार लोकांचा समावेश असून सोनम आणि इतर तिघांना अटक करण्यात आली आहे. एका आरोपीचा शोध सुरु आहे. तपास काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली

संबंधित पोस्ट

प्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे जिल्ह्यातील २२७ पूरग्रस्तांची सुटका पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मदतीसाठी प्रशासन तत्पर !

vishwatmaklokswamivarta

बालविवाह निर्मुलनासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन  

जिल्ह्यात १९ डिसेंबरपासून सुशासन सप्ताह राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागाकडून अनधिकृत दुकाने तसेच दुकानांची वाढीव बांधकामे आज निष्कासित…

vishwatmaklokswamivarta

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारी रोजी होणार मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं