vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग,  शेतमजूर,, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू,अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक*दिवसातून दोनवेळा करणार आरोग्य तपासणी…

माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग,  शेतमजूर,, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू,अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक*दिवसातून दोनवेळा करणार आरोग्य तपासणी…

राज्य प्रतिनिधी -अमरावती,  : माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी दि. 8 जून पासून मोझरी, ता. तिवसा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक तैनात केले आहे.

आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या आंदोलनाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या पथकाला आंदोलक बच्चू कडू आणि इतरांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.यासाठी दोन तज्‍ज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले असून, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका तज्‍ज्ञ डॉक्टरांचाही यात समावेश आहे. हे पथक दिवसातून दोन वेळा आंदोलकांच्या आरोग्याची तपासणी करेल आणि आवश्यक उपाययोजना करून त्याचा अहवाल दररोज दोन वेळा सादर करेल.

ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी यापूर्वी 24 मे रोजी आणि 4 जून रोजी निवेदन दिले होते. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.

000000

 

00000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पावसाची नोंद) दि. २२.०५.२०२५ सकाळी ८:३० वाजेपर्यंत..

vishwatmaklokswamivarta

नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!’-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक-लोणावळा बसस्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पाहणी

टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्यादृष्टीने दृष्टीने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज्‍यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा! सुनेत्राताई अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष प्रमुख

गणपती बाप्पा मोरया’ मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी!

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते माणगाव येथे सेवा पंधरवड्याचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta