vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पैठण येथे पर्यटन स्थळांना सुविधा तयार कराव्यात : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

पैठण येथे पर्यटन स्थळांना सुविधा तयार कराव्यात : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

    मुंबई, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या शहराला अध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्व आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक तसेच पर्यटक देखील येत असतात. पैठणचा पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधा तयार कराव्यात तसेच याआराखड्यातील कामे स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात यावीत असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

  मंत्रालयात पैठण विकास आराखड्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी पर्यटनराज्यमंत्री इंद्रनील नाईक,खासदार संदीपान भुमरे,आमदार रत्नाकर गुट्टे,माजी विधानसभा सदस्य विलास भुमरे,पर्यटन विभागाचे प्रधानसचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी,दूरदृश्यप्रणालीव्दारे छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभाग राजेंद्र बोरकर यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

  पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की,पैठण हे सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे शहर आहे.पैठण हे उत्कृष्ठ पैठणीसाठी देखील प्रसिध्द आहे.तसेच संत एकनाथ,ज्ञानेश्वर आणि चांगदेव महाराज संताचे निवासस्थान म्हणूनही या शहराला अध्यात्मिक महत्व आहे.या शहरात भाविक आणि पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत असतात हे लक्षात घेवून या भागाचा पर्यटन दृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे.पर्यावरणपूरक विकास होण्यासाठी सर्वसमावेशक पर्यटन आराखडा बनवावा प्रथम टप्प्‌यात स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत कामे प्रस्तावित करण्यात यावीत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.या भागाचा टप्प्‌याने विकास करण्यावर भर दिला जाईल असेही ते म्हणाले.

 

                पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की,पैठण येथील पायाभूत सुविधांचा विकास,घाट विकास,भक्त निवास,स्थानिक संस्कृती हस्तकलेचा प्रचार,संत एकनाथ मंदिर रोषणाई, जांभुल वन,दक्षिण काशी मैदान,आपेगाव विकास ही सर्व कामे टप्प्‌याने करण्यासाठी पर्यटन विभागाने प्रस्ताव सुधारित तयार करून सादर करावा अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील ३०३ जणांना समारंभपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान,सरकारी नोकरी म्हणजे जनतेच्या सेवेची संधी- पालकमंत्री संजय शिरसाट

भारतीय हवाई दल आजपासून फ्रान्समध्ये होणाऱ्या गरुड २५ या द्विपक्षीय हवाई सरावाच्या ८ व्या आवृत्तीत सहभाग

vishwatmaklokswamivarta

शेख मुकरम यांच्या हस्ते बालाजी सोनटक्के यांचा सत्कार

१४० किलोमीटर समुद्र किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी रत्नागिरीकरांची – पालकमंत्री डॉ. उदय सामंत सुरक्षित तटम् समृद्ध भारत ; सीआयएसएफ वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन

vishwatmaklokswamivarta

🌸 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – आधार प्रमाणीकरण (e-KYC) बाबत महत्त्वाची माहिती 🌸

vishwatmaklokswamivarta

27 ते 30 सप्टेंबर कालावधीत पाठ्यपुस्तक मंडळांची सर्व व्यवहार बंद

vishwatmaklokswamivarta