vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात ११३ गावांमध्ये शिबिरे*; *१६ ते ३० जूनदरम्यान लाभार्थ्यांना विविध सेवा*_जिल्हाधिकारी किशन जावळे

*धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात ११३ गावांमध्ये शिबिरे*; *१६ ते ३० जूनदरम्यान लाभार्थ्यांना विविध सेवा*_जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड जिमाका, देशातील आदिवासी बांधवांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA-JGUA)” संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर रायगड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ११३ आदिवासी गावांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.हे अभियान प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM-JANMAN)च्या धर्तीवर असून, गावपातळीवर थेट शिबिरे आयोजित करून विविध शासकीय योजनांचे लाभ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर सह-अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, पेण हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

*१६ ते ३० जूनदरम्यान गावागावांत शिबिरे*जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये १६ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून गावपातळीवर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये आधार कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, पीएम किसान सन्मान योजना, जन धन खाते, शिष्यवृत्ती कव्हरेज, उज्वला गॅस योजना, जातीचे दाखले, रहिवासी दाखले, घरकुल योजना, पीएम मातृ वंदना योजना, आरोग्य तपासणी अशा अनेक योजनांचे लाभ दिले जाणार आहेत.

*११३ गावांमध्ये अभियानाचा विस्तार*या अभियानांतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या ११३ गावांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.उरण (२), पनवेल (१४), कर्जत (२४), खालापूर (१०), पेण (२०), अलिबाग (१३), मुरूड (२), रोहा (९), सुधागड (१०), माणगाव (२), तळा (१), श्रीवर्धन (३), म्हसळा (१), महाड (२).

संबंधित पोस्ट

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

vishwatmaklokswamivarta

जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे उद्घाटन भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी – समीर डोंगरे

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्याशिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविणार

vishwatmaklokswamivarta

फलटण येथे पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’ प्रदर्शनास वारकऱ्यांचा प्रतिसाद

काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

प्रगती प्रकल्पामुळे पाच जिल्ह्यातील १,६०० खाटांची आरोग्य सुविधा बळकट होणार – मंत्री प्रकाश आबिटकर महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ

vishwatmaklokswamivarta