vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वारी मार्गावरील विविध ठिकाणी भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन

वारी मार्गावरील विविध ठिकाणी भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन

सातारा प्रतिनिधी: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा यांच्या समन्वयाने श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी सातारा जिल्ह्यामधील लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या मुक्कामी ठिकाणी विविध आरोग्य सेवा पुरविल्या जाणार आहेत.

 आरोग्य शिबीर २६ जून ते २९ जून २०२५ असे चार दिवस आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत विविध आरोग्य योजनांबाबत जनप्रबोधन केले जाणार आहे. तसेच नेत्र तपासणी, दंतचिकित्सा, शल्यचिकित्सा, अस्थिरोग चिकित्सा, निदानात्मक, उपचारात्मक सोयीसुविधा, औषध पुरवठा व चरण सेवा (फिजिओथेरपी सर्विसेस) इत्यादी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सेवांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महावि‌द्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘बहु-संस्थात्मक आपत्ती सज्जता सराव’ संपन्न-चक्रीवादळ आणि आपत्कालीन परिस्थितीचा यशस्वी मुकाबला*

विकासकामांना पूर्ण वेगाने पूढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक-दोन आठवड्याच्यावर विकासकामे प्रलंबित ठेवू नये शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा…

vishwatmaklokswamivarta

श्रीगोंदा येथील क्रीडा संकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारे ठरेल – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलश्रीगोंदा येथे ८.५० कोटींच्या सुविधायुक्त क्रीडा संकुलाचे भूमिपूजन संपन्न-नूतन शासकीय विश्रामगृहाच्या कामाची पाहणी

vishwatmaklokswamivarta

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे   

DJP कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

जालना विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अवघ्या ५७ दिवसांत निकाल देत आरोपीला नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

vishwatmaklokswamivarta