vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्रीगोंदा येथील क्रीडा संकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारे ठरेल – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलश्रीगोंदा येथे ८.५० कोटींच्या सुविधायुक्त क्रीडा संकुलाचे भूमिपूजन संपन्न-नूतन शासकीय विश्रामगृहाच्या कामाची पाहणी

श्रीगोंदा येथील क्रीडा संकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारे ठरेल – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलश्रीगोंदा येथे ८.५० कोटींच्या सुविधायुक्त क्रीडा संकुलाचे भूमिपूजन संपन्न-नूतन शासकीय विश्रामगृहाच्या कामाची पाहणी

अहिल्यानगर, प्रतिनिधी:- “ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा नैपुण्य आहे. त्यांना योग्य संधी, सुविधा व व्यासपीठ मिळाले तर ते राज्य व देश पातळीवर नक्कीच चमकदार कामगिरी करू शकतात. श्रीगोंदा येथे उभारण्यात येणारे हे क्रीडा संकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारे ठरेल,” असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

​श्रीगोंदा शहरातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या व सर्व आधुनिक सोयींनी युक्त अशा क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री.विखे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्षा श्रीमती सुनीता खेतमाळीस, तहसीलदार सचिन डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, मुख्याधिकारी पुष्पागंधा भगत, तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे आदी उपस्थित होते.

​सुमारे ८ कोटी ५० लक्ष रुपये निधीतून २ हेक्टर जागेवर हे क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. या क्रीडा संकुलामध्ये बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस तसेच कुस्ती व कबड्डीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर मॅट व प्रशस्त हॉल उपलब्ध असतील. यासोबतच प्रेक्षक गॅलरी, खेळाडूंसाठी कपडे बदलण्याचे स्वतंत्र कक्ष, उत्तम प्रकाशव्यवस्था आदी आधुनिक सुविधा येथे पुरविल्या जाणार आहेत.

नवीन शासकीय विश्रामगृहाची पाहणी : – भूमिपूजन कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी श्रीगोंदा येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शासकीय विश्रामगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी बांधकामाची गुणवत्ता, खोल्यांची रचना, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, पार्किंग आणि सभागृह आदी बाबींचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना कामाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.

0000

संबंधित पोस्ट

इराणने मर्यादा ओलांडल्यास पुन्हा हवाई हल्ले; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा 

मराठवाड्यात शिवसेनेचा नवा चेहरा डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर दुहेरी जबाबदारी..शिवसेना पक्ष संघटनेतील महत्वाच्या पक्ष सचिव पदा सह सहमुख्य संपर्क प्रमुख मराठवाडा (नांदेड आणि हिंगोली जिल्हा शिवसेना पक्षसंघटना) नियुक्ती करून मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा पुन्हा विश्वास

आरावी व श्रीवर्धन बीच विकासकामांचा-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

सनातनच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात ९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न ! आगामी भीषण आपत्काळातून तारण्यासाठी व ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही !   – सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘रामराज्य’ स्थापनेचा जागर

राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांचा गौरव रमेश थोरात, सिद्धार्थ शिंगाडे व प्रितम देवसकर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

तृतीयपंथीयांच्या बेकायदेशीर कृत्यांना चाप लावण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू