vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नागरिकांच्या शारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी 21 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील

नागरिकांच्या शारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी 21 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा प्रतिनिधी: शारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी योग नियमीत जीवनाचा भाग म्हणून स्वीकारला पाहिजे यासाठी येत्या 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात योगा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेली बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व योग प्रशिक्षक उपस्थित होते.जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत, विद्यालय, महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे. योग दिन मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठी शासकीय सभागृहे उपलब्ध करुन द्यावीत. तसेच मंगल कार्यालये असोसिएशनशी संपर्क साधून एका तासासाठी मोफत कार्यालये उपलब्ध करुन घेण्याविषयी कार्यवाही करावी.

जिल्ह्यात विविध ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रमांचे चांगले नियोजन करा. त्या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करा. योग विषयक प्रचार व प्रसाराचे कार्य करणाऱ्या विविध संस्थांचे सहकार्य घ्यावे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम सकाळी 7 ते 8 या वेळेत घ्यावा. शासकीय अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत परिपत्रकही काढावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.

संबंधित पोस्ट

रायगड आणि आसपासच्या भागांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी …

vishwatmaklokswamivarta

पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत कुस्ती व लॉन टेनिसविभागीय निवड चाचणी दि.२३ रोजी

स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’मुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे सर्व निकाल वेळेत जाहीर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

शिर्डी येथे होळीनिमित्त श्री साईबाबा संस्थान तर्फे समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट..

स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांनी खेळला पर्यावरणपूरक टाळ्यांचा गरबा

vishwatmaklokswamivarta