vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बांधा बांधावर शेतकरी-अधिकारी सुसंवाद-जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी शेतकऱ्यांच्या भेटीला शेतात

बांधा बांधावर शेतकरी-अधिकारी सुसंवाद-जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी शेतकऱ्यांच्या भेटीला शेतात

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यातील अधिकारी आज शेताच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांशी बोलले. खरीप हंगामाच्या तयारीविषयी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीरही दिला. आज जिल्ह्यातील शेतांच्या बांधा बांधावर असा शेतकरी- अधिकारी सुसंवाद होतांना दिसला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी हाउपक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. शेतकऱ्यांना खरिप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे शंका समाधान,बी बियाणे,खते त्याचप्रमाणे पीककर्ज प्रक्रिया, शेतरस्ता, इत्यादी विषयावरील तक्रारीवरील शंका, समाधान करण्यासाठी अधिकारी बांधावर गेले. आजपासून हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी स्वामी हे स्वतः लक्ष्मण खंडेराव रहाणे, गट नं १२ नांदगाव ता. वैजापूर या शेतकऱ्याच्या शेतात गेले होते. महसूल, ग्रामविकास, कृषी विभाग, भूमी अभिलेख, विविध बॅंकांचे अधिकारी यात सहभागी झाले.

या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी कार्यालयात घेऊन येण्याऐवजी प्रत्यक्ष त्यांच्याकडेच जाऊन त्यांच्या बांधावर अधिकाऱ्याने अडचणी सोडवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या शेत रस्ता, इतर सुविधा, मालकी हक्क, फेरफार, खत ,बी – बियाणांची उपलब्धता याविषयी संवाद साधला जाणार आहे.यामध्ये महसूल, कृषी ग्रामविकास, सहकार, भूमी अभिलेख,वन विभाग या विभागाचे सर्व अधिकारी तालुकानिहाय नियोजन करून किमान प्रत्येकी १० शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी देणार आहेत.या भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रमुख उद्देश असल्याचे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आले आहे. गावोगावी भेटी घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून त्या सोडविण्यात याव्यात असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

०००००

संबंधित पोस्ट

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांना २० डिसेंबरपर्यंत बंदी

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ…

नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संवेदना व्यक्त

बुलढाण्यात शुक्रवारी रोजगार मेळावा व मार्गदर्शन सत्र> नामांकीत कंपन्यात नोकरीची संधी> थेट मुलाखतीने निवड> विदेशातील रोजगार संधी व पीएम इंटर्नशिपविषयी मार्गदर्शन मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूर येथे दिनांक 8 डिसेंबरपासून सुरू होणार

vishwatmaklokswamivarta