vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अन्न व औषध प्रशासन’ची प्रतिबंधित गुटखा, पान मसालावर कारवाई १२ लाख १६ हजार ९६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

अन्न व औषध प्रशासन’ची प्रतिबंधित गुटखा, पान मसालावर कारवाई१२ लाख १६ हजार ९६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात अन्न व औषध प्रशासनाची प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याविरुद्ध मोहीम सुरू असून ३० व ३१ मे २०२६ या दोन दिवसात तब्बल ३२ आरोपींना अटक करण्यात आली असून, २६ आस्थापना सील व १२ लाख १६ हजार ९६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई, कोंकण, पुणे, नाशिक व छत्रपती संभाजीनगर, अमरावती या विभागात कारवाई करण्यात आली. त्यात कोकण विभागात तब्बल १६ आस्थापनाविरुद्ध कारवाई करून १६ लोकांना अटक करण्यात आली. बृहन्मुंबईत एका ठिकाणी कारवाई करण्यात आली व दोन जणांना अटक करण्यात आली. पुण्यात तीन ठिकाणी कारवाई करून दोन जणांना अटक, नाशिकमध्ये दोन कारवाई, दोन जणांना अटक छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ कारवाई व सात जणांना अटक करण्यात आली. तसेच अमरावतीमध्ये तीन कारवाई व तीन जणांना अटक करण्यात आली.

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध भारतीय न्याय संहिता चे कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याचे कलम २६, २७, ३०(२) (a) आणि कलम ५९ अंतर्गत एफआयआर दाखल करून अटक करण्यात आली.

अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका येताच नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. तक्रार करतेवेळी स्वतःचे नाव व पत्ता/संपर्क क्रमांक, भेसळ केल्या जाणाऱ्या ठिकाणाचा या आस्थापनेचा अचूक पत्ता व कोणत्या अन्नपदार्थात भेसळ केली जाते याची माहिती तक्रारीत नमूद करावी, असे आवाहन आयुक्त मुंढे यांनी केले आहे

0000

संबंधित पोस्ट

धारावी की जंक्शन ते धारावी खाडी कलानगर भर रस्त्यात अस्वच्छता मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देतील का?

vishwatmaklokswamivarta

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात ‘हलाल प्रमाणपत्रां’वर बंदीची मागणी-उपमुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !

मुंबई शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबवा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

22 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

अंबरनाथकरांना शाश्वत व स्वच्छ पाणी देण्यासाठी नियोजन करावे- पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील