vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

मुंबई, प्रतिनि:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती एमपीएससीने दिली आहे.

एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना पुढील चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करावी लागणार आहे: 1. आधार ऑनलाइन ई-केवायसी, 2. आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी, 3. आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी, 4. नॉन-आधार ऑफलाइन केवायसी या चार पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करता येणार आहे.

 अर्ज करण्याआधीच ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. याशिवाय, एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवणेही आवश्यक आहे. जर उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली, तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. संदर्भाने, एमपीएससीने मार्च 2017 पासून ऑनलाइन प्रणालीत आधार क्रमांक नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. .ही प्रणाली लागू केल्यामुळे उमेदवारांची ओळख अचूकरीत्या प्रमाणिकरण करता येणार असून, फसवणूक आणि चुकीच्या माहितीला आळा बसेल. विशेष म्हणजे, विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि राज्य शासनाने एमपीएससीला अधिकृत मान्यता दिली असून, आता भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरण वापरता येणार आहे.

 

००००००

संबंधित पोस्ट

विद्यार्थ्यांनी बौद्धिक, शारीरिक क्षमता वाढवून कौशल्य प्राप्त करावे – राज्यपाल हरिभाऊ बागडे

बनावट कागदपत्रांद्वारे जालन्यातील सर्व्हे ५५४ मधील 5 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न उघडकीस,न्यायालयाच्या आदेशावरून तत्कालीन भूमी अभिलेख अधीक्षक व दुय्यम निबंधकासह ५ जणांवर गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट* महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा समावेश* -रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांची माहिती* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त

जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा-डॉ. नीलम गोऱ्हे

मुठा नदीवरील धोकादायक पूल कायमस्वरूपी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश

जालना शहरासाठी श्रमदान – एक दिवस- एक तास शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी हातभार लावा      – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

vishwatmaklokswamivarta