vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव बनले विद्यार्थ्यांचे सारथीपहिल्या दिवशी शाळकरी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत..

केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव बनले विद्यार्थ्यांचे सारथीपहिल्या दिवशी शाळकरी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत..

बुलढाणा, राज्य प्रतिनिधी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर आजपासून शाळांचे सत्र सुरु झाले असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी मेहकर तालुक्यातील मादणी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे सारथी बनून बैलगाडीने शाळेत आणले.

दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर विदर्भातील शाळेची पहिली घंटा सोमवारी २३ जूनला वाजली. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत केंद्रीय राज्यमंत्री ना. जाधव यांनी मादणी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गावातून प्रवेशोत्सव दिंडी वाजतगाजत काढण्यात आली. या शाळा प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांना अद्ययावत दफ्तर आणि शालेय गणवेश वाटप करणेयात आले

केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या जवळपास १७ हजार विद्यार्थ्यांना या अद्ययावत स्कूल बॅग वाटप करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शाळा प्रवेशोत्सवात जिल्हा परिषदेच्या मादणी शाळेपासून करण्यात आला.

ना. प्रतापराव जाधव म्हणाले की, शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा चांगले दर्जेदार शैक्षणिक साहित्य मिळावे, या हेतूने ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या स्कूल बॅग वाटप करण्यात येत आहे. ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत आज प्रवेशोत्सवच्या निमित्याने करण्याचे भाग्य मला मिळाले. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना अद्ययावत स्कूल बॅग देण्याचा शुभारंभ आज मादणी गावातून सुरु केला असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्र,पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले 

vishwatmaklokswamivarta

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन..

अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ