vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

खते कुठे उपलब्ध?”आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार दैनंदिन माहितीजिल्हा परिषद, ठाणे कृषि विभागाचा अभिनव उपक्रम; Blogspot द्वारे खत साठा व उपलब्धतेची माहिती ऑनलाईन..

“खते कुठे उपलब्ध?”आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार दैनंदिन माहितीजिल्हा परिषद, ठाणे कृषि विभागाचा अभिनव उपक्रम; Blogspot द्वारे खत साठा व उपलब्धतेची माहिती ऑनलाईन..

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत कृषि विभागाने शेतकऱ्यांना रासायनिक खतांची माहिती घरबसल्या, सहज उपलब्ध व्हावी यासाठी Blogspot या लोकप्रिय आणि सुलभ माध्यमाचा वापर करून खते माहिती प्रणाली सुरू केली आहे.

           ठाणे जिल्ह्यात सध्या एकूण १६२ रासायनिक खत विक्री केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांवरून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानित खतांची विक्री करण्यात येते. मात्र अनेकदा खतांची उपलब्धता कळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना वेळ व संसाधनांचा अपव्यय होतो. याला पर्याय म्हणून कृषि विभागाने तयार केलेला Blogspot (https://adothane.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding_72.html) हा पर्याय शेतकऱ्यांसाठी एक प्रगत व पारदर्शक डिजिटल साधन ठरत आहे.

या Blog च्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांचा साठा, खतांचे प्रकार, केंद्र चालकांचा मोबाईल क्रमांक, यासारखी माहिती सहज मिळते. जिल्हानिहाय, तालुकानिहाय आणि केंद्रनिहाय माहिती ही या प्लॅटफॉर्मवर दैनंदिन अद्ययावत करण्यात येते. परिणामी शेतकरी खत खरेदीचे अचूक नियोजन करू शकतात आणि गरजेनुसार योग्य केंद्राची निवड करू शकतात     Blogspot वापरणे अत्यंत सुलभ आहे. हे कोणत्याही स्मार्टफोनवर मोफत आणि कोणतीही अ‍ॅप डाऊनलोड न करता चालते. सदर माहिती संपूर्णपणे पारदर्शक व सार्वजनिक वापरासाठी खुली आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला योग्य वेळेत योग्य माहिती मिळू शकते.

    या उपक्रमाबाबत कृषि विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर यांनी सांगितले की,”डिजिटल यंत्रणांचा प्रभावी वापर करून आम्ही शेतकऱ्यांना वेळेत आणि अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहोत. या उपक्रमामुळे खत खरेदी सुलभ होणार असून, शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील. भविष्यात अधिकाधिक सुविधा या Blogspot च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.”

000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2025 चे आयोजन उद्योजक,नवउद्योजक, गुंतवणूकदारांनी उपस्थित राहावे

आज आदरणीय दादांना जाऊन पाच महिने पूर्ण झाले… सुनेत्रा ताई अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सचा केला सत्कार महाराष्ट्र एनसीसी देशात सर्वोत्कृष्ट: राज्यपालांकडून कॅडेट्स ना कौतुकाची थाप..

vishwatmaklokswamivarta

माझी वसुंधरा अभियान 5.0′ मध्ये 10 लक्ष लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई राज्यात व्दितीय**’माझी वसुंधरा अभियान ‘4.0’ आणि ‘5.0′ मध्ये व्दितीय क्रमांकाचे 2 पुरस्कार प्रदान**‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ मध्ये ‘भूमी’ थीमॅटिक स्पेशल कॅटेगरीत सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार*

विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विकासाचे नियोजन करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा सामाजिक न्याय दिन साजरा घर घर संविधान योजनेचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले पुणे जिल्ह्यातील दोन सुपुत्र – कौस्तुभ गानबोटे व संतोष जगदाळे या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.