vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

चंद्रपूर शहरातील नाल्यावर उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करणार- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

चंद्रपूर शहरातील नाल्यावर उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करणार- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई, द प्रतिनिधी : चंद्रपूर शहरातील आकाशवाणी मार्गावरील नाल्यावर पूर संरक्षक भिंतीचे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून काम करण्यात आले आहे. या नाल्यावरील उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे प्रस्ताव सादर करून या भिंतीचे कामही पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

चंद्रपूर शहरातील नालावरील संरक्षक भिंती बाबत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री श्री. राठोड म्हणाले, नाल्याची नैसर्गिक रुंदी आणि प्रवाह कायम ठेवण्याबाबत तपासून घेऊनच नाल्यावरील उर्वरित संरक्षण भिंतीचे काम करण्यात येईल. याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीही करण्यात येईल. नाला संपूर्ण चंद्रपूर शहरातून जात असल्याने संपूर्ण नाल्याचा नैसर्गिक प्रवाह लक्षात घेऊनच जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

नाल्यावरील संरक्षक भिंतीला जिल्हा नियोजन निधीतून ५ जुलै २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. नाल्यावरील १२७ मीटर लांबीच्या संरक्षक भिंतीचे काम १५ डिसेंबर २०२४ पूर्ण करण्यात आले, अशी माहितीही मंत्री श्री. राठोड यांनी दिली. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य विजय वडेट्टीवार, किशोर जोरगेवार यांनीही सहभाग घेतला.

संबंधित पोस्ट

हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

संरक्षणमंत्र्यांनी नाशिकमध्ये एचएएलच्या स्मार्ट टाऊनशिपचे केले अनावरण

vishwatmaklokswamivarta

थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहीम राबविणार- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मा.आ.कैलास गोरंटयाल आज गुरु गणेश भवनमध्ये स्वीकारणार शुभेच्छा

महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समाज समिती चा महामोर्चा…

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका ‘एक्स-आयएनएस गुलदार’ समुद्रतळावर यशस्वीरित्या स्थापित..महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटन प्रकल्प…