vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विठ्ठल दर्शनासाठी खामगावहून ‘हरीभक्तांची’ रेल्वे पंढरपूरकडे रवाना- केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी

विठ्ठल दर्शनासाठी खामगावहून ‘हरीभक्तांची’ रेल्वे पंढरपूरकडे रवाना- केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी

बुलढाणा, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सोयीसाठी आज खामगाव येथून ‘विठ्ठल दर्शन एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वे मोठ्या जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाली. या पहिल्या फेरित एकूण १६२९ भाविक सहभागी झाले होते. रेल्वेला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते खामगाव रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, सागर फुंडकर उपस्थित होते. या वारकऱ्यांना खामगावकरांनी ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’च्या गजरात हजारोंच्या संख्येने निरोप दिला.

स्टेशन परिसरात भक्तीरसात न्हालेली गर्दी, टाळ-मृदुंगाच्या गजरात गाणारे वारकरी, व विविध संघटनांकडून करण्यात आलेले अल्पोपहार व पाण्याचे वाटप यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्हालेला होता. गेल्या सात वर्षांपासून खामगावहून आषाढी एकादशीसाठी ही विशेष रेल्वे सेवा सुरु असून यंदाही बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या पहिल्या फेरितून विभागाला ६ लाख ३२ हजार ३५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असून यामध्ये सर्वसाधारण, राखीव व वातानुकूलित तिकिटांचा समावेश आहे. या पवित्र यात्रेच्या आयोजनासाठी व व्यवस्थापनासाठी स्थानिक, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांचे योगदान उल्लेखनीय होते.

 

०००

संबंधित पोस्ट

अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार१०० वर्षीय वृद्धेला अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या बालिकेची सुटका; चाईल्ड हेल्प लाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज करणार प्रबोधन

vishwatmaklokswamivarta

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड . निलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट…

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन-जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे सहभागाचे आवाहन

स्टँड-अप कॉमेडीयन कुणाल कामरा यांच्या वक्तव्यांवर शासनाची कठोर भूमिका- गृह राज्यमंत्री योगेश कदम