vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन-जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे सहभागाचे आवाहन

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन-जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे सहभागाचे आवाहन

         अमरावती, प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येत्या 8 मार्च 2026 रोजी अमरावती जिल्ह्यात महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आणि सक्षमीकरण उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम पार पडणार आहेत. महिलांमध्ये स्वसंरक्षणाची भावना निर्माण व्हावी आणि त्यांना विविध क्षेत्रांत प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

विभागीय क्रीडा संकुल, अमरावती येथे 8 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपासून विविध खेळांच्या स्पर्धांना सुरुवात होईल. यामध्ये प्रामुख्याने आर्चरी, मल्लखांब, बॅडमिंटन, हॅण्डबॉल, स्क्वॅश, टेबल टेनिस, सॉफ्टबॉल, बेसबॉल आणि व्हॉलीबॉल यांसारख्या खेळांचा समावेश आहे. विविध क्रीडा संघटनांच्या सहकार्याने या स्पर्धांचे नियोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील महिला खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची ही मोठी संधी आहे.

    केवळ खेळांपुरते मर्यादित न राहता, महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी देखील विशेष सत्रे आयोजित केली आहेत. अंजनगाव सुर्जी येथे रोशनी महिला मंडळाच्या सहकार्याने ‘स्वयंरोजगार: काळाची गरज’ आणि ‘कौटुंबिक हिंसाचार व कायदा व्यवस्था’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच लघुउद्योगासाठी मार्गदर्शन करून यशस्वी उद्योजक महिलांचा सत्कार केला जाईल. यासोबतच मार्डी रोड येथील जिल्हा क्रीडा संकुलात ‘वॉरियर्स स्पोर्ट्स अकॅडमी’ तर्फे कराटे स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

    या दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या महिला खेळाडूंचा विशेष गौरव केला जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला व युवतींनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० वे शहीदी समागम वर्ष-जिल्ह्यातील शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी

vishwatmaklokswamivarta

मसलगा सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीची कार्यवाही गतीने करावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले▪️पुढील पावसाळ्यात पूर्णक्षमतेने पाणीसाठा होण्याच्या दृष्टीने काम व्हावे

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक ! उज्जैनच्या संतांच्या मागणीला मंदिर महासंघाचा जाहीर पाठिंबा ,गोमांस खाणारे व मूर्तीपूजा न मानणारे यांना मंदिरात प्रवेशबंदी करा ! – मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतांचा पुरेसा साठा आणि तातडीची मदत द्या – पालकमंत्री नितेश राणे जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक संपन्न

मालवणी, अंबोजवाडी परिसरात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित १०००० चौ.मी. शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जालना महानगराच्या वतीने भव्य रक्तदान,समाजसेवाच देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची खरी ओळख-भास्कर आबा दानवे