vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वडगाव शेरी मतदारसंघात पुरापासून संरक्षणाच्या कामांसाठी२५० कोटीचा निधी मंजूर- उद्योगमंत्री उदय सामंत

वडगाव शेरी मतदारसंघात पुरापासून संरक्षणाच्या कामांसाठी२५० कोटीचा निधी मंजूर- उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, प्रतिनिधी:- वडगाव शेरी मतदारसंघात पुरापासून संरक्षणाच्या कामांसाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यापैकी ७० कोटी रुपये प्राप्त झाली आहेत. यातून या भागात पुरापासून संरक्षण विषयक पायाभूत सुविधांची कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.सदस्य बापूसाहेब पठारे यांनी या संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत यांनी माहिती दिली.

मुळा नदीच्या पुरामुळे येरवडा, विश्रांतवाडी, कळस भागात दरवर्षी गंभीर पूरस्थिती निर्माण होते, यावर कायमस्वरुपी प्रतिबंधात्मक योजना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) अंतर्गत UFRMP प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही व पब्लिक अॅड्रेस सिस्टीम यंत्रणा अतर्भूत असलेले खांब नदीलगतच्या भागात बसविण्याचे नियोजन असून त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.

मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले, यंदा खडकवासला धरणातून १६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग असतानाही या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. या भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासंबंधी देखील सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असेही उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

000000

संबंधित पोस्ट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे31 मार्च पर्यंत महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या एन्काऊंटर दोन दहशतवाद्यांचा खात्मा…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

समाजातील शेवटच्या घटकासाठी कार्य हीच अर्थपूर्ण जीवनाची दिशा ! -न्यायमूर्ती अनिल किलोर  – विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न  – प्राधिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना लाभाचे वितरण

98 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन‘अभिजात मराठी’चा जयघोष, ग्रंथदिंडीने संमेलनाचा जागर सुरू तालकटोरा स्टेडियमचा परिसर मराठीमय…

vishwatmaklokswamivarta

दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु