vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

१९९३ च्या दंगलीतील ३२ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

१९९३ च्या दंगलीतील ३२ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

मुंबई/ प्रतिनिधी:वडाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने १९९३ सालच्या दंगली प्रकरणातील ३२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला कौशल्यपूर्ण तपास व शोध मोहिमेद्वारे अखेर अटक केली आहे. आरीफ अली हशमुल्ला खान (वय ५४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

पोलीस आयुक्त बृहनमुंबई, देवेन भारती यांच्या सूचनेनुसार शहरात पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्याकरिता विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेच्या अंतर्गत बंदर परिमंडळातील वडाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने सन १९९३ मधील दंगलीप्रकरणी भा.दं.वि. कलम १४१, १४३, १४५, १४६, १४७, १४८, १४९, १५०, ३०७ नुसार दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीचा कसोशिने शोध सुरू केला.

आरोपी आरीफ खान गेली अनेक वर्षे गायब होता. त्याचा कोणताही ठावठिकाणा उपलब्ध नसताना पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मूळ गावात जाऊन माहिती मिळवली. त्यातून मिळालेल्या सुगम मार्गाचा मागोवा घेत मुंबईतील अँटॉप हिल आणि दिनबंधू नगर झोपडपट्टी परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या साहाय्याने सापळा रचून अखेर ५ जुलै रोजी दिनबंधू नगर येथून आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याला तत्काळ न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस उपायुक्त (बंदर परिमंडळ) विजयकांत सागर यांनी वडाळा पोलीस ठाण्याच्या पथकाला बक्षीस देऊन गौरविले आहे.ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (का. व सु.) सत्यनारायण, अप्पर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक) अभिवन देशमुख, पोलीस उपायुक्त (बंदर परिमंडळ) विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त (वडाळा विभाग) विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर, सहायक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद, पोलीस उपनिरीक्षक सौरभ मुसळे, शरद खाटमोडे, पोहवा कासार, दहिफळे, पो.शि. कलाने, चौधरी, वलेकर, शेलार व मखरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बंदर परिमंडळात पाहिजे व फरार आरोपींच्या शोधासाठी मोहिम सुरूच असून, यापुढेही अशा आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

संबंधित पोस्ट

संकल्प ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध स्पर्धेला गोरेगाव येथे दमदार सुरुवात

vishwatmaklokswamivarta

एकल महिला धोरण कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद

नमुंमपा ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी व पालकांनी बनविलेल्या दिवाळी वस्तू व फराळ प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद….

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन रेजपिल एनसीबीने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे केले उद्ध्वस्त; भारतामध्ये पहिल्यांदाच, पश्चिम आशियात वापरल्या जाणाऱ्या ‘कॅप्टागॉन’ या सायकोट्रॉपिक पदार्थाची जप्तीची कारवाई

एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा- अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

vishwatmaklokswamivarta

महिला व बालविकास विभागाने योजनांची अंमलबजावणी करताना मानवी दृष्टिकोन ठेवावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन