vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

आज आमदार संजय गायकवाड यांच्या मारहणीच्या निषेधार्थ विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार आंदोलन,चड्डी बनियन गँग हाय हाय, गुंडाराजचं करायचं काय, खाली डोकं वर पाय; जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, दानवे थेट टॉवेल बनियनवर विधानभवनात!

आज आमदार संजय गायकवाड यांच्या मारहणीच्या निषेधार्थ विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार आंदोलन,चड्डी बनियन गँग हाय हाय, गुंडाराजचं करायचं काय, खाली डोकं वर पाय; जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, दानवे थेट टॉवेल बनियनवर विधानभवनात!

मुंबई प्रतिनिधी –

आज आमदार संजय गायकवाड यांच्या मारहणीच्या निषेधार्थ विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार आंदोलन,

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमध्ये चड्डी बनियनवर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली. एबीपी माझाने या मारहाणीविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज (16 जुलै) संजय गायकवाड यांच्या मारहणीच्या निषेधार्थ विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरती जोरदार आंदोलन केलं. यावेळी सरकार विरोधात एकच घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला.

यावेळी चड्डी बनियन गँग हाय हाय, या गुंडाराज सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या लुटारू सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अशा घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आला. या आंदोलनामध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधातील बॅनर सुद्धा लक्ष वेधून घेत होता. महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियनचा धिक्कार असो असा या बॅनरवरती उल्लेख करण्यात आला होता, तर बाजूलाच संजय गायकवाड यांचा बॉक्सिंग अवतारमधील फोटो होता. दुसरीकडे विधानसभा अधिवेशनाचा कालावधी तीन दिवस राहिलेला असतानाही आतापर्यंत विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज दिवसभरात पडसाद उमटणार का? याकडे लक्ष असेल.

संबंधित पोस्ट

विधानसभा लक्षवेधी :बेकायदेशीर जमीन खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज महाकुंभवर काय म्हणाले ते पहा वादग्रस्त विधान..

vishwatmaklokswamivarta

उभाठा खासदार संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. 

महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करून जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन