vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज महाकुंभवर काय म्हणाले ते पहा वादग्रस्त विधान..

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज महाकुंभवर काय म्हणाले ते पहा वादग्रस्त विधान..

 

राज्य प्रतिनिधी –

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज महाकुंभवर वादग्रस्त विधान केले आहे. मौनी अमावस्येला महाकुंभ येथे झालेल्या चेंगराचेंगरीवर टीका करताना त्यांनी ‘महाकुंभ आता मृत्युच्या कुंभात बदलला’, असे म्हटले आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला

महाकुंभात व्हीआयपींना सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. पण गरिबांकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाकुंभात येणाऱ्या भाविकांना सुविधा नाकारल्या जात आहेत. महाकुंभात भाविकांची गर्दी, प्रयागराज संगम स्टेशन बंद होणे आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी यावरून त्यांनी योगी सरकारवर कडाडून टीका केली त्यांनी सरकारवर गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की महाकुंभ आता मृत्युकुंभात रूपांतरित झाला आहे. व्हीआयपी लोकांना सुविधा पुरवल्या जात आहेत. परंतु सर्वसामान्यांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंनंतर मृतदेह शवविच्छेदन न करता बंगालला पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

येत्या महाशिवरात्रीला महा कुंभाच्या स्नानाचा शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे आता गर्दी ही वाढू लागली आहे त्याला नियंत्रित करण्याचे काम उत्तर प्रदेश सरकारही करू लागली आहे सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कोणतेही अनुसूचित दुर्घटना घडू नये याचीही सतर्कता यावेळी घेण्यात येत आहे असल्याचे प्रशासनाकडून कळते.

संबंधित पोस्ट

अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती करा – रस्ता सुरक्षा समितीची राज्य शासनाला सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची मुख्य सचिवांसमवेत बैठक; हेल्मेट वापर आणि ब्लॅक स्पॉट्स कमी करण्यावर विशेष भर

vishwatmaklokswamivarta

युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प: हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन !रामराज्य स्थापनेसाठी देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात ४५ हून अधिक ठिकाणी, सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!

नवी मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल ” — महापौर-उपमहापौर निवडीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित-श्रीगणेशदर्शन स्पर्धा व दुर्गबांधणी स्पर्धेचे 26 फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण

गुटखा उत्पादकांवर नवीन वर्षात मकोका लागणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

vishwatmaklokswamivarta