vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पत्रकारांसाठी कार्यशाळा तज्ज्ञांनी सांगितले कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र आणि शुद्धलेखनाचे मंत्र..

पत्रकारांसाठी कार्यशाळा तज्ज्ञांनी सांगितले कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र आणि शुद्धलेखनाचे मंत्र..

  छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-माहिती आणि महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजीत पत्रकारांसाठी कार्यशाळेत तज्ज्ञांनी पत्रकारांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र आणि प्रमाणभाषा लेखनाच्या शुद्धलेखनाचे मंत्र सांगितले. तीन वेगवेगळ्या सत्रात तज्ज्ञांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तीन विविध विषयावर पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात आले. उद्घाटन सत्रानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर जिल्हा सुचना विज्ञान केंद्राचे माहिती केंद्र माहिती व अधिकारी विद्याधर शेळके, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांनी केले. विविध कृत्रिम बुद्धिमत्ता ॲपचा वापर, त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले. त्यासोबतच सायबर सुरक्षा, भाषांतर, ऑडीओ रुपांतरण, ऑडीओ ते मजकूर रुपांतरण, फाईल निर्मिती, अहवाल विश्लेषण, आकडेवारी विश्लेषण, ग्राफिक्स, छायाचित्र, निवड भाषेचा योग्य वापर यासंदर्भातील माहिती व सादरीकरण शरद दिवेकर यांनी केले.

जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी शासनामार्फत माहिती जनसंपर्क विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती दिली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी, अधिस्वीकृती पत्रिका याबाबत पात्रता, निकष, आवश्यक कागदपत्रे याविषयीची माहिती दिली.

प्रा. दीपक रंगारी यांनी ‘मराठी भाषेचा पत्रकारितेमध्ये सुयोग्य वापर आणि प्रमाण लेखन’ याविषयी मार्गदर्शन केले. मराठी प्रमाणभाषेच्या शुद्धलेखनाचे नियम, शब्दाचा अर्थ, भाषेतील व्याकरणाचा वापर याबरोबरच मराठी भाषा समृद्ध करण्यात विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली.वाक्यामध्ये येणारी क्रियापदे, शब्दयोगी अव्यय, ऱ्हस्व, दीर्घ,ईकारांत याबरोबरच एकाक्षरी क्रियापद, शब्दयोगी अव्यय, तत्सम आणि तद्भव शब्दांविषयीचे स्पष्टीकरण उदाहरणासह समजावून सांगितले. पत्रकाराने शब्दकोश आणि लेखनकोश याचा वापर करून निर्दोष लिखाण कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले. विविध शब्दांच्या वाक्यानुसार आणि वेळेनुसार होणारा बदल उदाहरणासह सांगितला.

या कार्यशाळेसाठी आकाशवाणीचे वृत्तसंपादक समरजीत ठाकूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेतील जनसंपर्क विभागाचे संजय वाघ, सतीश औरंगाबादकर, आरोग्य विभागाच्या संवाद तज्ज्ञ विद्या सानप, पत्रकारांच्या संघटनांचे अध्यक्ष व सदस्य या कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.दैनिक पुण्यनगरी चे विजय बहादुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

०००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने सातत्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट…

vishwatmaklokswamivarta

वरदायनी माता मंदिर परिसरातील पूल धोकादायक स्थितीत; वाहतुकीस तात्काळ बंदी..

हवामान विभागानं -पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

युआयटीच्या पहिल्या बॅचने आपल्या कामगिरीतून संस्थेची नवी ओळख घडवावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**बी.टेक. विद्यार्थ्यांचा ‘दीक्षा आरंभ’ उत्साहात; तांत्रिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्य व आत्मविश्वास विकसित करण्याचे आवाहन*दोन महिन्यांच्या इंटर्नशिपमधून विद्यार्थ्यांना मिळणार उद्योगांचा प्रत्यक्ष अनुभव; विविध कंपन्या व उद्योगांमध्ये करिअरच्या व्यापक संधी*राज्यस्तरीय ॲथलेटिक्समध्ये चमकलेल्या मोनिका सानू मडावीचा गौरव; गडचिरोलीत सुसज्ज ॲथलेटिक ट्रॅक उभारणीला शासनाची मंजुरी*

vishwatmaklokswamivarta

देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील जांबुटके येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जमिनीचे हस्तांतरण

राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करुन ते १५० रुपयांवरुन १७० रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री अजित पवार