vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी कोंडवाडे बांधण्याकरिता जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करा -उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी कोंडवाडे बांधण्याकरिता जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करा -उपमुख्यमंत्री

बारामती, प्रतिनिधी शहरात भटकी जनावरे, कुत्र्यांचा वावर तसेच त्याबाबत नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेत नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, त्यासाठी शहरातील विविध भागात कोंडवाड्याकरिता जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

 

बारामती परिसरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, दशक्रिया घाट, शारदा प्रांगण येथील सुरु असलेली विविध विकास कामे, प्रस्तावित माळावरची देवी ते जळोची चौक चारपदरी रस्ता, जळोची कॅनाल पुलावरून संभाजीनगरकडे जाणारा रस्ता, कॅनाल लगतची गार्डन जागा, जळोची ओढ्याशेजारील दशक्रिया घाट, दहनभूमी, दफनभूमी जागा, रुई हद्दीतील विद्या प्रतिष्ठान शेजारील दोन लहान पूल, गार्डन, स्मशानभूमी, पूर संरक्षण भिंतीच्या प्रस्तावित जागेची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी केली.

प्रस्तावित जागेवर करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी करुन श्री. पवार म्हणाले, बारामती परिसरातील हद्दवाढ लक्षात घेता प्रस्तावित जागेवर कामे सुरु करावीत. कामात अडथळा आणणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी. या परिसरातील रुई-जळोची ओढा रुंदीकरणाची कामे करताना मोजणी करुन त्यामध्ये अतिक्रमण असल्यास ती काढावीत. या ओढ्याच्या दोन्ही बाजूस पूर संरक्षण भिंतीचे बांधकाम करावे.

शारदा प्रांगण परिसरात उभारण्यात येणाऱ्या सीबीएसई आणि मराठी शाळेत विद्यार्थी व शिक्षकांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विचार करुन इमारत व परिसर विकसित करा. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांकरिता सोयी-सुविधांचा करुन शौचालय, पाणी, विद्युत व्यवस्था आदींच्या अनुषंगाने कामे करावीत.

बाबूजी नाईक वाडा, दशक्रिया घाट परिसरात सावली देणारी झाडे लावावीत. दशक्रिया घाट परिसरामध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा मिळतील यादृष्टीने नियोजन करुन कामे करावीत. पाणी साचणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. कविवर्य मोरोपंत यांच्या स्मारकाची आवश्यक ती डागडुजी करुन घ्यावी. नदी पात्रातील ड्रेनहोल चेंबर्सला आवश्यक अंतर सोडून वृक्षारोपण करावे.

बारामती परिसरात विविध विकासकामे सुरु असून आगामी काळात होणारी हद्दवाढीचा विचार करुन पुढची शंभर वर्ष उपयोगात येईल, तसेच कामे करताना ती देखभाल विरहित झाली पाहिजेत, यादृष्टीने नियोजन करून कामे करा, असे निर्देश श्री. पवार यांनी दिले

0000

संबंधित पोस्ट

भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत”जमीन विक्रीसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

तारळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; जमिनीवर नावे लावण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्या- पालकमंत्री शंभूराज देसाई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संगणक-आधारित परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय जुलै २०२७ पर्यंत स्थगित

विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणांना गती देण्याच्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या सूचना  जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध; रासायनिक खतांचा तुटवडा नाही तक्रारींसाठी तालुका, जिल्हास्तरीय कृषी कार्यालयाकडे संपर्क साधावा

राज्यात गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला वेग लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्याचे आवाहन