vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संत गजानन महाराज पालखीचे जालना शहरात आगमनभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते भव्य स्वागत…

संत गजानन महाराज पालखीचे जालना शहरात आगमनभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते भव्य स्वागत…

जालना,  (प्रतिनिधी) – श्री संत गजानन महाराज शेगाव पालखी सोहळ्याचे (ता.२१) जालना शहरात अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पालखी आगमनाच्या निमित्ताने शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

हजारो भक्तांच्या उपस्थितीत, फुलांची उधळण, भजन-कीर्तन आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखीचे शहरात स्वागत करण्यात आले. या पावन प्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांनी श्रींच्या पालखीचे हारतुरे घालून, पुष्पवृष्टी करत व चरणी वंदन करून स्वागत केले.

शहरातील विविध मंडळे, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते, महिला आणि नागरिकांनी भगव्या पताका, रांगोळ्या व सजवलेल्या रथांच्या माध्यमातून सोहळ्याचे स्वागत करून वातावरण भक्तिमय बनवले होते.

शिस्तबद्ध मिरवणूक, भक्तांची उपस्थिती आणि शहरवासीयांचा भरघोस प्रतिसाद यामुळे आजचा दिवस ऐतिहासिक ठरला.

000000

संबंधित पोस्ट

महाज्योतीच्या वतीने विद्यार्थ्यांना टॅब वाटप

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज रहावे- नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन

महाराष्ट्रातील मोठी बातमी- उद्याच सुनेत्रा अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री पदी..

vishwatmaklokswamivarta

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर यांच्या मार्फत सन २०२६-२७ साठी ‘५० टक्के अनुदान योजना’ (७ लाभार्थी) आणि ‘बीज भांडवल योजना’ (१० लाभार्थी’) याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन    

ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद