vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

मतदान यंत्र तपासणी कार्यक्रम  सुरू२१ ते २३ जुलै दरम्यान चालणार प्रक्रिया

मतदान यंत्र तपासणी कार्यक्रम  सुरू२१ ते २३ जुलै दरम्यान चालणार प्रक्रिया

रायगड, प्रतिनिधी-जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी मतदान यंत्रांतील Burnt Memory तपासणी व पडताळणी कार्यक्रम सुरु झाला आहे. हा कार्यक्रम दिनांक २१ जुलै  पासून सुरू झाला असून २३ जुलै  पर्यंत तीन दिवस चालणार आहे. जिल्हाधिकारी रायगड, श्री. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखी मध्ये सदरची प्रक्रिया पार पाडली जात आहे.

जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, रायगड जिल्हा मध्‍यवर्ती मतदान यंत्र वेअरहाऊस, शितोळे, पेण येथे ही संपूर्ण प्रक्रिया व्हिडीओ चित्रिकरणद्वारे तपासणी  सुरु आहे. दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत ही तपासणी केली जात आहे.

या प्रक्रियेमध्ये १८८ पनवेल  विधानसभा मतदारसंघातील ५ मतदान केंद्रावरील आणि १९२ अलिबाग विधानसभा मतदारसंघातील ४ मतदान केंद्रावरील निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्सच्या Burnt Memory ची पडताळणी सर्व संबंधित निवडणूक उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत बेल कंपनीचे अभियंता यांचे मार्फत केली जात असून, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राहणार आहे.

०००

संबंधित पोस्ट

धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक

धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

जलपुनर्भरणाचे धोरण तयार करावे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

महाराष्ट्र दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन…

गोठ्यात आता कालवडींचे प्रमाण वाढणार  सेक्स सॉर्टेड सिमेनसाठी नियोजनमधून एक कोटीचा निधी मंजूर- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार- जिल्ह्यात सध्या 17 हजार 391 सिमेन डोस उपलब्ध

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती भवनात ‘आरएसएस @१०० : अ सेंच्युरी ऑफ सर्व्हिस, युनिटी अँड सॅक्रिफाइस’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.