vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अल्पसंख्याक समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवा- ललित गांधीजैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला विविध विषयाचा आढावा…

अल्पसंख्याक समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवा- ललित गांधीजैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला विविध विषयाचा आढावा…

बुलडाणा, प्रतिनिधी): जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रविकास कार्यक्रमासह अल्पसंख्याकांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. शासनाच्या विविध योजनाचा लाभ अल्पसंख्याक समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजीत बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले की, अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या विचारात घेवून जिल्ह्यात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी अल्पसंख्याक समुदायाचे वर्गीकरण करणे आवश्यक असून कोणताही समाज विकासापासून वंचित राहू नये यासाठी सर्वानी प्रयत्न करावे. अल्पसंख्याक समुदायाच्या भागातील रस्ते, सभागृहाची राहिलेली अपूर्ण कामे वेळेत पार पाडावी. बुलढाणा जिल्ह्यातील जैन समाजाच्या प्राचिन मंदिरांना तिर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हा उद्योग केंद्राकडील अल्पसंख्याक समुदायासाठी 3 टक्के राखीव असलेली कर्ज प्रकरणे तातडीने मार्गी लावावी. तसेच व्‍यवसाय कोणत्या पध्दतीने केला पाहिजे यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकांनी शिबीरे घेवून गरजवंतांना कर्ज मंजूर करावेत, असे सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.निबंध स्पर्धा पुरस्कारांचे ललित गांधी यांच्या हस्ते वितरभगवान महावीर निर्वाण कल्याणक निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर निवड झालेल्या स्पर्धेकांना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांच्या हस्ते नियोजन भवन सभागृहात प्रमाणपत्र व धनादेश वितरण करण्यात आले. यामध्ये निधी भन्साली, चंदन देशमाने, रिध्दी मेहत्रे, श्रावणी गायकवाड, ऋतुजा चेके, दिव्या औतकर, अरहिंत बोरुंदीया, श्रेयश परसाने, लबांधी खातोड व समृद्ध चिंचोले यांना पारितोषिक देण्यात आले.

000000

संबंधित पोस्ट

आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी-संगठन मजबूत करावे – भास्कर (आबा) दानवे,जालना शहरातील संग्राम नगर येथे भाजयुमो चे शाखा उदघाटन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाच्या ‘ई-भूमिती’ प्रकल्पाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना पुरस्कार प्रदान

ग्रोयान्स बंधारा, जेट्टी बांधणे व नौकानयन मार्गातील गाळ काढणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प -मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री-नितेश राणे

नांदेड जिल्ह्यास दस्त नोंदणीतून सरकारी तिजोरीत 221 कोटी 43 लाख जमा18 कार्यालयांमधून 65 हजार 674 दस्तांची नोंदणी’एक जिल्हा एक नोंदणी’व शनिवार-रविवार कार्यालय सुविधेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद,मध्यस्थांना फाटा देऊन थेट नोंदणी करण्याचे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेतून जलसंवर्धनाच्या कार्याला नवसंजीवनी देण्याचा संकल्प – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा’ ही प्रभावी ठरणार – प्रा. राम शिंदे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सामाजिक समता कार्यक्रम संपन्न