vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन…

इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन…

मुंबई( प्रतिनिधी )  मुंबई – इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. यावर्षीची दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली

असून विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मुंबई विभागाअंतर्गत सहायक संचालक, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधवा असे आवाहन वंदना कोचुरे, प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई विभाग यांनी केले आहे.

   इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरण्यात यावे. सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी दिनांक 01 ऑगस्ट 2025 ते 17 ऑगस्ट 2025 या कालावधीत बी.ए/बी.कॉम/बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए/एम.एस.सी/एम.कॉम असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत. या योजनांची अंतिम यादीची निवड संबंधित जिल्ह्याच्या सहायक संचालक यांची राहिल. तरी सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन वंदना कोचुरे, प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई विभाग यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसेसची संख्या वाढवावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· परिवहन सेवा सक्षम करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

जिल्हा व सत्र न्यायालयातील वापरात नसलेल्या वस्तुंचा 24 जुलै रोजी लिलाव

समृद्ध जीवनमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत न मिळाल्यास उग्र आंदोलन करणार – शाहूराज माने, अध्यक्ष जनसंघर्ष समिती

नवा भारत-सांस्कृतिक महासत्ता’ विषयावरील चित्रकला स्पर्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील ७५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

जवाहर नवोदय विद्यालयात लॅटरल एन्ट्रीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दहा डिसेंबर सकाळी एक वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मेगा ब्लॉक-मध्य रेल्वेने कल्याण आणि लोणावळा स्थानकांदरम्यान आवश्यक पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती आणि जतनासाठी एक विशेष अभियांत्रिकी ब्लॉक जाहीर

vishwatmaklokswamivarta