vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसेसची संख्या वाढवावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· परिवहन सेवा सक्षम करण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसेसची संख्या वाढवावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· परिवहन सेवा सक्षम करण्याचे निर्देश

मुंबई, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करावे. जिल्ह्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करून त्या प्रमाणात बसेस देऊन परिवहन सेवा सक्षम करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस.टी. महामंडळाशी सबंधित विविध विषयांबाबत बैठक झाली. त्यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते.बैठकीस आमदार निलेश राणे, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, वेंगुर्ला आणि कुडाळ आगाराला पाच बसेस देण्यात याव्यात. ओरोस येथील प्रवासी संख्या व शासकीय कार्यालये लक्षात घेता बस स्थानकाचा विस्तार करावा. बस स्थानकाचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर विकास करून प्रशस्त बसस्थानकाची निर्मिती करावी.

कार्यरत कर्मचारी संख्या आणि बसेसची संख्या लक्षात घेऊन नियोजन करावे. कर्मचाऱ्यांअभावी बसेस थांबून प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विभागीय नियंत्रक रिक्त पदावर अधिकारी देण्यात यावा, असे निर्देशही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

000

 

संबंधित पोस्ट

बेपत्ता व्यक्ती आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘रेड्स’ AI ॲपची राष्ट्रीय स्तरावर दखल

शहर पाणीपुरवठा योजना; संयुक्त तांत्रिक पाहणी करुनअहवाल सादर करावा- इ.मा.व.कल्याण मंत्री अतुल सावे..

vishwatmaklokswamivarta

मोटार वाहन कर अधिनियमात सुधारणा

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना आखणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा घेतला आढावा- उद्योजकांशीही साधला संवाद, कामगारांचे केवायसी करण्याच्या सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेमार्ग आणि जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूलाचं लोकार्पण

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन देशातील पुरोगामी समाजव्यवस्था आणि महिलांचा सर्वक्षेत्रातील वावर हा महात्मा जोतीबांनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी आणि परिश्रमांचे फळ – उपमुख्यमंत्री अजित पवार