vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मोटार वाहन कर अधिनियमात सुधारणा

मोटार वाहन कर अधिनियमात सुधारणा

सातारा प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण पत्र भाग 4 मधील असाधारण क्र.21 नुसार मोटार वाहन कर अधिनियमात सुधारणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2025 पासून करण्यात येणार असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी दिली आहे.

सीएनजी व एलपीजीवर चालणारी दुचाकी व चारचाकी वाहने 10 लाखापर्यंत 8 टक्के व 10 लाख ते 20 लाखापर्यंत 9 टक्के आणि 20 लाखावरील वाहनांकरिता 10 टक्के, बॅटरीवर चालणारे मोटार वाहनाची किंमत 30 लाखापेक्षा अधिक असल्यास किंमतीच्या 6 टक्के, क्रेन्स, क्रॉम्पेसर्स, प्राजेक्टर्स किंवा खनिजे यासारखी बांधकामाकरिता वापली जाणारी कोणतेही मोटार वाहने नवीन धोरणानुसार वाहनांच्या किंमतीच्या 7 टक्के, ओझे लादलेले असताना, ज्याचे नोंदणीकृत वजन 7500 किलो ग्रॅमपेक्षा अधिक नसेल अशी माल किंवा सामग्री यांची वाहतुककरिता वापरली जाणारी मालवाहू वाहने नवीन धारेणानुसार वाहनाच्या किंमतीच्या 7 टक्के अशी नवीन कर रचना असणार आहे, असेही श्री. म्हेत्रे यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

बोअरवेल्स संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी..

vishwatmaklokswamivarta

वाचनाने जीवनाकडे पाहण्याच्या नवदृष्टीचा विकास   – जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर,‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाने जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये नववर्षाचे स्वागत! 

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता मिनी ट्रॅक्टरसाठी-स्वयंसहाय्यता बचत गटांना 31 मे पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

चालू वर्षात जिल्हा नियोजनचा ७४४ कोटी रुपये निधी मंजूर**गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी – पालकमंत्री शंभूराज देसाई*

पी. एम. किसान योजना: सर्व लाभार्थ्यांनी 30 जून 2026 पूर्वी वार्षिक ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक; कृषी विभागाचे आवाहन

महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समाज समिती चा महामोर्चा…

vishwatmaklokswamivarta