vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

चंदनवाडी शिवसेना शाखेच्या वतीने 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

चंदनवाडी शिवसेना शाखेच्या वतीने 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

ठाणे प्रतिनिधी  शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे येथील चंदनवाडी शिवसेना शाखेच्या वतीने 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शनिवार दि.21/06/2025 संध्याकाळी 7.00 वाजता शिवसेना चंदनवाडी शाखा येथे शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ व शिवसेना शहरप्रमुख प्रदिप शिंदे यांच्या शुभहस्ते आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाला या सोहळ्यामध्ये 100 हून अधिक 10 वी आणि 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शिवसेना उपविभागप्रमुख, शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा समन्वयक आणि हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ अहिरे यांचा वाढदिवस शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला तेव्हा त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील कामाबद्दल यू.एस.ए. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सर्टिफिकेट ऑफ अचीवमेंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आरोग्य विषयक महत्वपूर्ण असे श्रवण यंत्र वाटप तसेच विविध सोसायटी मंडळांना फर्स्ट एड बॉक्स ही वितरित करण्यात आले त्याप्रसंगी ठामपा माजी आरोग्य सभापती दत्ताराम (अप्पा) मोरे, शिवसेना शहर समन्वयक रामभाऊ काळे,शिवसेना उपशहरप्रमुख वसंत गव्हाळे, शिवसेना विभागप्रमुख जिवाजी कदम, उपविभागप्रमुख दत्ता सावंत, सुरेश सावंत, शिवसेना शाखाप्रमुख तानाजी कदम, ज्ञानेश्वर बागवे, भास्कर शिर्के, संजय भोसले, धोंडू मोरे,

संदिप राणे, हेमंत पाष्टे, उपशाखाप्रमुख जगदीश शिर्के तसेच शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ. प्रशांत विट्ठल भुईंबर, देवशी राठोड, अजय राणे, अझीम शेख, अक्षता पांचाळ, चंद्रकांत विधाटे, अजित माने, लितेश केरकर त्याचबरोबर हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव श्री.सचिन त्रिवेदी, वर्तक, मांडवकर, योगेश आणि प्रभागातील सर्व मित्र परिवार , शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक,शिव आरोग्य सेना पदाधिकारी, आरोग्य सैनिक, हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला.

बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांची गय नको ; महसूल व पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश-जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचा निपटारा : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

सेवाभाव, समर्पण आणि मानवतेचा दिव्य उत्सव78व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचा शुभारंभ मुंबई व महाराष्ट्रातून हजारो सेवादार समालखाला रवानाआत्ममंथन करून मनामध्ये व्याप्त दुर्गुण दूर करा- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज..

vishwatmaklokswamivarta

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे — ✅ ‘उत्कृष्टता केंद्रा’चे भूमिपूजन ✅ ‘चक्र’ (सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) चे उदघाटन

अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल- उपमुख्यमंत्री अजित पवारश्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

मॉडेल सोलर व्हिलेज” साठी जिल्ह्यात १५ गावात होणार स्पर्धा – जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील-१ कोटी रूपयाचे केंद्रीय अर्थ सहाय्य मिळणार