vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दि.5ऑगस्ट रोजी पनवेल येथे जनता दरबाराचे आयोजन ….       

दि.5ऑगस्ट रोजी पनवेल येथे जनता दरबाराचे आयोजन ….

रायगड प्रतिनिधी:- वैध मापन शास्त्र, यंत्रणेच्या कार्यपध्दतीत पारदर्शकता वाढविणे, लोकसंपर्क दृढ करणे आणि ग्राहकांच्या तक्रारीचे वेळेवर निराकरण करणे या उद्देशाने उपनियंत्रक वैध मापन शास्त्र, रायगड जिल्हा क्रमांक 1 यांच्या वतीने कार्यालय, निरीक्षक वैध मापन शास्त्र, पनवेल नर्मदा कॉम्फ्लेक्स गाळा क्रमांक 34,35, व 36 स्टेशन रोड पनवेल येथे दि.05 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12. 30 वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपनियंत्रक वैध मापन शास्त्र रायगड जि.क्र.1 संजीव कवरे यांनी दिली आहे.

जनता दरबारामध्ये ग्राहक संघटना, व्यापारी उपयोगकर्ते संघटना, उत्पादक/पॅकर यांना वैध मापन शास्त्र, अधिनियम 2009 व त्या अंतर्गत नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून त्यांच्या कांही अडचणी असल्यास त्यांचे निराकरणही करण्यात येईल. जनता दरबारामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारी, सुचनाचे निराकरण करण्यासाठी व तात्काळ कार्यवाही करण्यासाठी विभागामधील अधिकारी प्रत्यक्ष हजर राहणार आहेत.

ग्राहक, वजने मापे उपयोगकर्ते, उत्पादक, आयतदार, औद्योगिक आस्थापना पॅकर तसेच परवानाधारक यांच्या कांही तक्रारी असल्यास कार्यालयाच्या Email ID-aclmrigad@yahoo.in, या ई-मेलवर किंवा प्रत्यक्ष कार्यालयमध्ये पाठवण्यात यावे.

0000000

संबंधित पोस्ट

दक्षता जनजागृती सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन- पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार- दि. 27 ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर 2025 कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह

vishwatmaklokswamivarta

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आरपीआय हीच आमची माय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**देशभरातील दलितांच्या राजकीय चळवळीचे आरपीआय हेच मातृस्थान* 

vishwatmaklokswamivarta

शासकीय आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

vishwatmaklokswamivarta

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे* जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने जनजागृती * जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

विदर्भातील ११ आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात दुग्धविकास प्रकल्प राबविणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यात नवी दिल्लीत बैठक

vishwatmaklokswamivarta

✨🎬 गणेशोत्सव 2025 निमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची रील स्पर्धा 🎬✨