vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन; पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन; पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात..

नवी दिल्ली, प्रतिनिधी: साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार 2026 आणि युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी पुस्तकांची नोंदणी सुरू केली आहे. अकादमीने मान्य केलेल्या 24 भारतीय भाषांमधील लेखक, प्रकाशक तसेच साहित्यप्रेमींना आपली पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बाल साहित्य पुरस्कारासाठी पात्रता,बाल साहित्य पुरस्कार 2010 पासून दरवर्षी 24 भारतीय भाषांमध्ये उत्कृष्ट बालसाहित्य निर्मितीसाठी दिला जातो. मराठीसह, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू या भाषांमध्ये लिहिलेली पुस्तके विचारात घेतली जातील.

पुस्तके 9 ते 16 वयोगटातील मुलांना लक्षात घेऊन लिहिलेली असावीत आणि ती 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत पहिल्यांदाच प्रकाशित झालेली असावीत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2025 आहे.

युवा साहित्य पुरस्कारासाठी पात्रता,2011 पासून सुरू झालेल्या युवा साहित्य पुरस्काराचा उद्देश 35 वर्षांखालील तरुण लेखकांना प्रोत्साहन देणे हा आहे. 1 जानेवारी 2026 पर्यंत लेखकाचे वय 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. अर्जदाराने प्रत्येक पुस्तकाच्या दोन प्रती तसेच जन्मतारखेचा पुरावा (आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार कार्ड) स्व-प्रमाणित प्रतीसह पाठवावा. पुस्तक सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे.

बाल आणि युवा पुरस्कार स्वरूपात 50,000/- रूपये रोख, ताम्रपट आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले जाईल. साहित्य अकादेमीच्या संकेतस्थळावर (www.sahityaakademi.gov.in) पुरस्कारासंबंधी सर्व नियम आणि सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

००००

 

संबंधित पोस्ट

परभणीतील 34 लाखांची मोबाईल चोरी उघडकीस!

ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांनी मानधन योजनेच्यालाभासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करावा- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे         

हिंद-दी-चादर’ कार्यक्रम जनजागृती उपक्रमाच्या अंमलबजावणीचा लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घेतला आढावा* लातूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये मंगळावर, बुधवारी प्रभात फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांना न्यायाची हमी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· गुन्हे सिद्धतेचा दर ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची नवीन फौजदारी कायद्यांमध्ये क्षमता· नवीन फौजदारी कायद्यांवरील ५ दिवसीय प्रदर्शनाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रासह 11 राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) निर्देश…

रावसाहेब पाटील दानवे यांनी केले भाजपाचे 1000 प्राथमिक सदस्य पुर्ण

vishwatmaklokswamivarta