vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जन धन खातेधारकांसाठी ई-केवायसी’ आणि जनसुरक्षा योजनांचीअंमलबजावणीसाठी बँक आपल्या गावात..

जन धन खातेधारकांसाठी ई-केवायसी’ आणि जनसुरक्षा योजनांचीअंमलबजावणीसाठी बँक आपल्या गावात..

रायगड जिमाका प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्व बँक खातेधारकांनी आपल्या जन धन खात्यांचे ‘री-केवायसी’ (Re-KYC) आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनसुरक्षा योजनांची नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आयोजित शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक श्री. विजय कुलकर्णी यांनी केले आहे.

हे अभियान भारत सरकारचे वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या निर्देशानुसार 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत सुरू आहे

रायगड जिल्ह्यात या अभियानाची सुरुवात 3 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांच्या उपस्थितीत झाली

शिबिरात उपलब्ध सुविधा,जिल्ह्यातील सर्व बँकांकडून वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये बँक ग्राहक खालील सेवांचा लाभ घेऊ शकतील:

जन धन खात्यांचे ‘री-केवायसी’ (Re-KYC): पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेल्या जन धन योजनेच्या खात्यांना दहा वर्षे पूर्ण झाल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार ‘री-केवायसी’ करणे अत्यावश्यक आहे. या शिबिरात हे काम केले जाईल.

प्रधानमंत्री जनसुरक्षा योजनांची नोंदणी:

 प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांसाठी नवीन नोंदणी करणे

विशेष मेळाव्याचे आयोजन,या अभियानाअंतर्गत शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 रोजी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंट्रल स्कूल, आमटेम येथे एका विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी साकव प्रकल्प संस्था पेण मदत करणार असुन त्यांच्या माध्यमातून पाबळ खोरे मधील कोंढवा, वरप, जिर्णे मधील आदिवासी लोकांची जनधन खाती तसेच त्यांना सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये सामावून घेतले जाणार आहे यासाठी नागोठणे आमटेम पाबळ खोरे आणि पेण तालुक्यातील सर्व लोकांनी तसेच बँक ऑफ इंडियाच्या सर्व ग्राहकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.

गावांमध्ये शिबिरे कधी होणार आहेत याची माहिती जवळच्या बँक शाखेत आणि ग्रामपंचायत कार्यालयात मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

एमएचटी-सीईटी 2026 परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांचीत्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

vishwatmaklokswamivarta

पैठण येथील युवती बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन

रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुलांचे बांधकाम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण

ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि जनजागृती मोहिमांमध्ये पुढाकार घ्यावा -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ