vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील 51 पर्यटक सुरक्षित राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती…

उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील 51 पर्यटक सुरक्षित राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती…

 

मुंबई, प्रतिनिधी: उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाली. या घटनेमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला व अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ व इतर जिल्ह्यांतील ४० अशा ५१ पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

उत्तराखंड मध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन तत्पर असून पर्यटकांची संपर्क करत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी संपर्क साधला जात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.

संपर्क क्रमांक:

* राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : ९३२१५८७१४३ / ०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९

* राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : ०१३५-२७१०३३४ / ८२१

०००००

संबंधित पोस्ट

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती

आरोग्य विभागाच्या योजना सामान्य लोकांपर्यत प्रभावीपणे पोहोचवा- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अमरावती विभागाने राज्यस्तरावर नावलौकिक मिळवावा – पालकमंत्री संजय राठोड पालकमंत्र्याच्या हस्ते विभागीय महसूल महोत्सवाचे उद्घाटन

राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत

सुशासनासाठी नागरिकांना सेवा संवेदनशील आणि गतिशीलतेने द्याव्यात- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर.

vishwatmaklokswamivarta