vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

देशातील  मोठे व्यवसायिक अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे; 17 हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप…

देशातील  मोठे व्यवसायिक अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे; 17 हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप…

राज्य प्रतिनिधी-

ईडीनंतर आता सीबीआयने देखील उद्योगपती अनिल अंबानी  यांच्या सहा ठिकाणांवर छापे टाकले आहे. याआधी कर्ज घोटाळाप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी छापे टाकले होते. त्यानंतर आज सीबीआयने अनिल अंबानी यांच्या जवळपास सहा ठिकाणी छापे टाकले आहेत. असल्याची विश्वसनीय सूत्रांकडची माहित समोर येत आहे

अनिल अंबानींच्या ठिकाणांवर सीबीआयचे छापे का ?

1. येस बँकेनं दिलेल्या 17 हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप

2. अनिल अंबानींनी मंजूर कर्ज अन्य कंपन्यांत वळवल्याचा आरोप

3. अनिल अंबानींनी कागदपत्रे देण्यास मागितला होता 10 दिवसांचा वेळ

4. दहा दिवसांचा वेळ न देता सीबीआयकडून आज 6 ठिकाणांवर छापे

5. अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अन्य निगडीत ठिकाणी छापे

काय तपास यंत्रणेचा दावा काय?

कर्जाची रक्कम कथितपणे इतर कंपन्यांकडे वळवण्यात आली आणि मनी लाँड्रिंगच्या कक्षेत येणाऱ्या विहित उद्देशाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरली गेली, असा आरोप आहे. या छाप्यांमध्ये अनेक कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर पुरावे ताब्यात घेण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणेचा आरोप आहे की रिलायन्स ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी येस बँकेकडून कोणतीही पुरेशी हमी न घेता मोठी कर्जे घेतली आणि शेल कंपन्यांद्वारे पैसे इतर कामांवर खर्च केले गेले. यापूर्वी, या प्रकरणात सीबीआयने दोन एफआयआर दाखल केले होते, त्यानंतर ईडीने तपास सुरू केला.

संबंधित पोस्ट

पूरपश्चात व्यवस्थापन तातडीने करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्यातील पूरस्थितीच्या अनुषंगाने घेतला आढावा

स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’मुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे सर्व निकाल वेळेत जाहीर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा

vishwatmaklokswamivarta

ग्रंथोत्सवामुळे वाचनसंस्कृतीला चालना– सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल,जिल्ह्यात सर्वसुविधायुक्त चार अभ्यासिका स्थापन करणार

vishwatmaklokswamivarta

सीएनजी महागला , सीएनजीच्या दरात आज दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आजपासून ही वाढ लागू 

बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित व 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार..