vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास २६ तारखेपर्यंत मुदतवाढ सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास २६ तारखेपर्यंत मुदतवाढ ..

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई, प्रतिनिधी: राज्य शासनाच्यावतीने या वर्षीपासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ च्या अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेस मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांना सहभागी होता यावे, यासाठी आता अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख मंगळवार दि. २६ ऑगस्ट २०२५ असेल.

या स्पर्धेचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून ऑनलाईन पोर्टलद्वारे ते स्वीकारले जाणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभागी होऊन तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पारितोषिके जिंकावीत, असे आवाहन मंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक सांगीतिक मानवंदना

vishwatmaklokswamivarta

खामगाव एमआयडीसीत एलपीजी गॅस गळतीचे ‘महा-मॉकड्रिल’ यशस्वीजिल्हा प्रशासनाच्या आपत्ती सज्जतेची मोठी चाचणी विविध यंत्रणांचा उत्स्फूर्त सहभाग

युवकांनी काळानुरूप शिक्षण व कौशल्य संपादन करावे : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत 1278 युवकांना रोजगार; नियुक्तीपत्र वितरण व 31 वाहनांचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीची चळवळ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

हातभट्टी विरोधी मोहिमेला वेग, दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta

कांदळवनाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी बक्षीस योजना राबविणार – वनमंत्री गणेश नाईक