vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग वरंध घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग वरंध घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला

रायगड प्रतिनिधी: जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडीवरील राजेवाडी ते वरंध (रायगड जिल्हा हद्द) हा रस्ता आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून अतिवृष्टीच्या दिवसांत मात्र हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे आणि भारतीय हवामान विभागाच्या हाय अलर्ट इशाऱ्यामुळे हा मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला होता. या बंदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आगामी गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक सुरु करण्याची मागणी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून केली जात होती.

या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी महाड विभाग यांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे. रस्ता आता पुन्हा सुरु करण्यात येत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.“अतिवृष्टीचा इशारा असलेल्या दिवसांत वरंध घाट रस्ता पूर्णतः बंद ठेवला जाईल. अशा वेळी स्थानिक पोलिस प्रशासनाने पुरेसा बंदोबस्त ठेवावा,” असे निर्देशही देण्यात आले आहेत.

संबंधित पोस्ट

ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन -उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य सरकार चा निर्णय  दुधाच्या भेसळीवर मोक्का कायदा लागू करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार…

खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव पाठीशी राहणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार खो-खो असोसिएशनची बैठक संपन्न; कामकाज होणार पेपरलेस; २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप

संत रोहिदास जयंती निमित्त धारावीतील संविधान चौकातून लोकसहभागासह जनजागृती

vishwatmaklokswamivarta

जी.डी.सी.अण्ड ए. व सी.एच.एम. परीक्षा २३, २४ व २५ मे रोजी*

vishwatmaklokswamivarta

राकाँपा जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस–मनसे युतीच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा; ठिकठिकाणी पुष्पहारांनी स्वागत..